१० दिवसात पथदिव्याची वाट

हिमायतनगर(वार्ताहर)राज्य रस्ता कमानीपासून ते परमेश्वर मंदिरापर्यंत बसविण्यात आलेल्या पथदिव्यांचे उद्घाटन होऊन पंधरवडा उलटण्यापूर्वीच अर्ध्याहून अधिक पथदिवे बंद पडल्याने झगमगलेले हिमायतनगरचा मुख्य रस्ता पुन्हा काळोखात गेला आहे. या निकृष्ठ कामाची चौकशी वरिष्ठ अधिकार्यांनी करून देयके रोकून दंडात्मक कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रयत्नांतून दुभाजकातील पथदिवे बसविण्यासाठी ४.५ लाखाच्या निधी मंजूर झाला होता. ग्रामपंचायत हिमायतनगर अंतर्गत सदर पाठदिव्याचे काम नांदेड येथील एका कंपनीमार्फत करण्यात आले, यातून ११ पथदिवे बसविण्यात आले होते. पथदिव्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दि.१३ जानेवारी रोजी सायंकाळी थाटामाटात उद्घाटन करताच हिमायतनगर शहर झगमगल्याने शहरवासियात आनंदाचे वातावरण होते. परंतु अवघ्या १० दिवसातच अर्ध्याहून अधिक पथदिवे बंद पडल्याने नागरिकांच्या आनंदावर विराझान पडले असून, रस्त्याने ये - जा करणाऱ्या प्रवाशी, नागरिक व वाहनधारकांना अडचण निर्माण होत आहे.

गुत्तेदाराने या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून निकृष्ठ कंपनीचे साहित्य वापरली आहेत. वापरण्यात आलेल्या खांबाची जाडी कमी करून पथदिवे सुद्धा क्रोस बसविली आहेत. एवढेच नव्हे तर उद्घाटनाच्या पहिल्याचा दिवशी एक पथदिवा बंद होता. त्यानंतर तो तर दुरुस्त केलाच नाही उलट आणखी पाच ते सहा पथदिवे बंद पडल्याने गुत्तेदारच्या निकृष्ठ कामाचे पितळे उघडे पडले आहे. अश्या पद्धतीने निकृष्ठ काम करणाऱ्या गुत्तेदाराच्या कामाची व वापरण्यात आलेल्या साहित्याची चौकशी करावी. आणि शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक केल्या प्रकरणी दंडात्मक कार्यवाही बरोबर काम दर्जेदार करून घ्यावे अशी रास्त मागणी विकास प्रेमी जनतेतून केली जात आहे.

या बाबत ग्रामसेवक शंकर गर्दसवार यांच्याशी संपर्क करून पथदिवे बंद पडण्याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी