बिलोली/नांदेड। एड्सची बाधा झालेल्या व्यक्तिंसोबत हस्तोंदोंलन, स्पर्श केल्याने, जेवण केल्यास एड्स हा रोग होत नाही.या बाबत लोकांमध्ये खुप गैरसमज आहे.एड्स बाबत गैरसमज दुर करण्यासाठी आज अश्या रॕली व एड्स सप्ताहाच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॕ.नागेश लखमावार यांनी केले.
जागतिक एड्स दिनानिमित्त उप जिल्हा रुग्णालय,अल ईम्रान प्रतिष्ठान बिलोली व आयसीटिसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दि.१ डिसेंबर २०२२ रोजी गुरुवारी रॕली काढुन जनजागृती करण्यात आली. यावेळी डाॕ.लखमावार हे बोलत होते.अल ईम्रान प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहसीन खान म्हणाले कि भारतात चेन्नई मध्ये १९८६ साली पहिला रुग्ण सापडला.या रोगा पासून बचाव करण्यासाठी एखाद्या व्यक्तिंने वापरलेली सुई पुन्हा वापरु नये.
एड्स झालेल्या व्यक्तिंच रक्त दुस-या व्यक्तिंच्या शरीरात गेले तर हा विषाणू पसरु शकतो असे ही यावेळी खान हे म्हणाले.यावेळी रॕलीला वैद्यकीय अधिक्षक डाॕ.नागेश लखमावार यांनी हिरवा झेंडा दाखवून रॕलीची सुरुवात केली. सदरिल रॕली ही दवाखान्यातून,बाजार गल्ली, वरटी गल्ली,छोटी गल्ली,विठ्ठल मंदिर,गांधी चौक ते पुन्हा रुग्णांलय येथे रॕली चा समारोप करण्यात आला.रॕलीत सहभागी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय व ओंकार नर्सिंग च्या विद्यार्थींनींनी वेगवेगळे घोषवाक्य सांगितले.यावेळी
वैद्यकीय अधिकारी डाॕ.विजयकुमार मोरे,ज्येष्ठ पञकार भिमराव बडूरकर, सय्यद रियाज, ईंन्चार्ज सिस्टर कल्पना ठाकुर,विमल कुडमुते, अनुसया चव्हाण,विद्या पवार,मोहिनी साबदे, वर्षा काशिंदे, ममता स्वामी,कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे शिक्षिका शारदा हनुमंते, ओंकार नर्सिंग काॕलेज चे शिक्षिका वेदिका ढोणे,कर्मचारी श्रीरंग स्वामी,राजेंद्र अनमुलवाड, एनसीडी समुपदेशक दिनेश तळणे, आकाश दासवाड आदिंची उपस्थित होते.एड्स दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अल ईम्रान प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहसीन खान, आयसीटिसीचे समुपदेशक देविदास भोईवार,प्रयोगशाळा तंञज्ञ शेख मोहमंद अन्सार यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुञसंचलन व आभार मोहसीन खान यांनी मानले.