अर्धापूर,निळकंठ मदने। इसापूर धरणातून या वर्षी रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांना पाणी मिळणार आहे .पण कधी सुटणार याची तारीख निश्चित करण्यात आली नसल्याने रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे .
अर्धापुर तालुका इसापूर धरणाच्या लाभक्षेत्रात येत असल्याने मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामातील पिके घेतली जातात . रब्बी हंगामात हरभरा ,गहु , ज्वारी घेतले जाते ,तसेच काही प्रमाणात कोरडवाहू शेती असल्याने इसापूर धरणाच्या पाण्यामुळे बहरली आहे .मागील दोन वर्षांपासून इसापूर धरण पूर्णक्षमतेने भरत असल्याने या धरणाच्या पाण्याचा सर्वाधिक लाभ अर्धापुर तालुक्याला झाला आहे .गत वर्षात रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांना पाणी सलग एक महिन्याच्या अंतराने पाणी सोडण्यात आले होते .त्याचा लाभही शेतकऱ्यांना झाला होता .
यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .खरिपातील नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी रब्बी हंगामाची जोरदार तयारी सुरु आहे .रब्बी हंगामातील पिकांवर शेतकऱ्यांच्या आशा ठेवून आहे .
यंदा अतिवृष्टीमुळे भूभर्गातील पाणी पातळी प्रचंड वाढली आहे .तसेच जमिनीत ओलावा कायम असल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाची पेरणीला सुरुवात झाली आहे .तालुक्यात आतापर्यंत २५ टक्के हरभरा पिकाची पेरणी झाली असून पुढील महिन्यात गव्हू पिकाची पेरणी होईल मात्र त्या अगोदर जमिनीला पाणी देण्यात येते मात्र धरणाच्या पाणी पाळ्याची तारीख निश्चित झाली नसल्याने गव्हाचे नियोजन बिघण्याची शक्यता आहे .
कालवा दुरुस्तीची गरज पुढील काळात इसापूर धरणातून रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांसाठी पाणी पाळ्या मिळतील मात्र त्याअगोदर कालव्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे .निमगाव मुख्य कालव्यातून सुटणारे पाणी अन्य सब कालव्यात येते मात्र छोट्या कालव्याची दयनीय अवस्था झाली आहे .कालव्यात झाडेझुडपे वाढली आहेत .दगड ,मातीने कालवे भरले आहेत .यामुळे पाण्याची व शेतकरीचे नुकसान होण्याची शक्यता आहे .याकरिता कालव्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे .