स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कार्यवाही
नांदेड| हिंगोली येथुन नांदेडकडे बसमधनुन येणारी महीला सौ. अर्चना अशोक बंडे हीचे पर्स मधुन 14 तोळे सोन्याचे दागीने कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेले होते. याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपीच्या शोधकमी स्थागुशाचे पथक तैनात होते. माल्ल्या गुप्त माहितीवरून बस मधुन महीलेचे पर्स मधील सोन्याचे दागीने चोरणारी महीलेस मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
हिंगोली येथुन नांदेडकडे बसमधनुन येणारी महीला सौ. अर्चना अशोक बंडे हीचे पर्स मधुन 14 तोळे सोन्याचे दागीने कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेले होते. त्यावरुन पोलीस ठाणे विमानतळ गुरनं. 306/2022 कलम 379 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद झाला होता. सदर गुन्हयातील आरोपीतांना अटक करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेळोवेळी पथके तयार करुन मालाविषयीचे गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु होते. दिनांक 03/12/2022 रोजी स्थागुशाचे पथक नांदेड शहरात पेट्रोलींग करीत असताना, त्यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की, पो स्टे विमानतळ गुरनं. 306 / 2022 कलम 379 भादंवि या गुन्हयातील महीला आरोपी सौ. दुर्गा राम कांबळे ही शांतीनगर, नांदेड येथे आहे व तीनेच तिच्या सोबतचे इतर महीलासोबत नमुद गुन्हयातील सोन्याचे दागीने चोरी केले आहेत.
मिळालेल्या माहिती वरीष्ठांना देवुन, स्थागुशाचे पथकाने शांतीनगर, नांदेड येथे जावून एका संशयीत महीलेस ताब्यात घेवुन नाव गाव विचारले. यावेळी तिने तिचे नाव सौ. दुर्गा राम कांबळे 24 वर्ष व्यवसाय मजुरी रा. शांतीनगर इतवारा नांदेड असे असल्याचे सांगीतले. तिस विश्वासात घेवुन गुन्हया संबंधाने व गुन्हयातील गेला माल संबंधाने विचारपुस केली असता, तीने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल करुन गुन्हा करताना तिचे सोबत तिचे साथीदार नामे 1) कविता वय अंदाजे 25 वर्ष 2) रेखा वय अंदाजे 45 वर्षे 3) सुनिता वय 40 वर्षे सर्व रा. पेंडारची झोपडपटी, वर्धा जि. वर्धा असे होते असे सांगीतले.
सदर महीलेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेले मालापैकी 46 ग्रॉ सोन्याचे दागीने (दोन चैन व एक मिनीगंठन) किंमती 2,48,400 /- रुपयाचा माल जप्त करण्यात आला असुन सदर महीलेस पुढील तपासकामी पोलीस ठाणे विमानतळ यांचे ताब्यात देण्यात आले आहे. नमुद महीला आरोपीकडुन आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदरची कामगिरी श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्दारकादास चिखलीकर पोलीस निरीक्षक स्थागूशा नांदेड, सपोनि / पांडुरंग माने, पोउपनि / दत्तात्रय काळे पो ना / विठल शेळके, पो कॉ / विलास कदम, रणधीर राजबन्सी, मोतीराम पवार, महेश बडगु, हेमंत बिचकेवार यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.