मौलाना आझाद जयंतीनिमित्त पदयात्रा, सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान
पुणे| मौलाना अबुल कलाम आझाद जयंती निमित्ताने जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय व इनक्रेडीबल समाजसेवक ग्रृप व इतर सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून 'नफरत छोडो, संविधान बचावो ' या विषयावर १२ किमी ची पदयात्रा कोंढवा खुर्द येथे काढण्यात आली.
सकाळी 7-30 ते 12 वाजे पर्यंत हि पदयात्रा कोंढवा गावठाण,भैरवनाथ मंदिर मार्गे शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, मिठानगर ,साईबाबा नगर या भागात काढण्यात आली. याचा उद्देश एकता बरोबर संविधानाची मुल्य जपणे हा सुध्दा होता.
नंतर मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जीवनावर आधारीत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्रभाग क्रमांक 26/27 या भागात सफाईचे कार्य करणाऱ्या महिला कर्मचारी यांचा सन्मान तसेच साडी वाटपाचा कार्यक्रम इनक्रेडीबल समाजसेवक ग्रृप तर्फे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे तसेच वक्ते म्हणून सुनीती सु.र., माजी महसूलमंत्री बाळासाहेब शिवरकर , राजेंद्र बहाळकर, इब्राहिम खान , पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या अधिकारी कल्पना बळिवंत ,सुल्तान शेख,जाहिद शेख उपस्थित होते.
सूत्रसंचालन इनक्रेडीबल समाजसेवक ग्रृप तर्फे असलम इसाक बागवान यांनी केले तर आभार नुरूल्ला शेख मानले. राजू सय्यद,सचिन अल्लाह,सादिक पानसरे,हाजी इम्तियाज शेख , कांचन बलनायके,हाजी हुसेन शेख,मजहर मणियार, अब्दुल बागवान , सुरेश गायकवाड,बाळा बिबवे यांच्यासह पदयात्रेत सफाई कर्मचारी तसेच असंख्य स्थानिक नागरिक उपस्थित होते.कोंढवा पोलिस स्टेशनचे एल आय बी अधिकारी अक्षय साळुंके यांनी विशेष सहाय्य केले .