नविन नांदेड। लक्ष्मी नरोबा देवस्थान मंदिर कौठा नांदेड कार्तिकी मास काकडा सांगता निमित्ताने सामुदायिक तुलसी विवाह सोहळ्याचे आयोजन ७ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आले असून यावेळी शिंदे यांच्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन व जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे यांच्या कडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लक्ष्मी नरोबा देवस्थान मंदिर समिती बसवेश्वर नगर कौठा नांदेड यांच्या वतीने सामुदायिक तुलसी विवाह ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला असून या सामुदायिक तुलसी विवाह मध्ये महिलांनी तुलसी सजावट करून मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविण्याचे आवाहन लक्ष्मी नरोबा देवस्थान समिती चा वतीने करण्यात आले असून, सामुदायिक विवाह सोहळा प्रसंगी भक्ती संगीत सह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे लक्ष्मी नरोबा देवस्थान समिती अध्यक्ष गंगाप्रसाद काकडे व समिती पदाधिकारी सदस्य यांनी केले आहे.