दिव्यांगाचे पालकमंत्री नांदेड यांना निवेदन हक्कापासुन वंचित ठेवणाऱ्या दोषि अधिकारी यांच्यावर दिव्यांग कायद्याप्रमाणे कार्यवाहि करा -NNL


नांदेड।
जिल्यातील दिव्यांगाना त्यांचे हक्क मिळावा म्हणून दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली मा.ग्रामविकास मंत्री,तथा नांदेडचे पालकम़त्री,यांची शिष्टमंडाळाने भेट घेऊन दिव्यांग बांधवाच्या हक्कासाठी नांदेड जिल्ह्यात अनेक निवेदन मोर्चा,आंदोलन करून वरीष्ठ अधिकारी लेखि आदेश देऊन सुध्दा कनिष्ठ अधिकारी पालन करीत नसल्यामुळे दिव्यांगाना हक्कापासुन वंचीत ठेवणाऱ्या अधिकारी यांची सखोल चौकशी करून दिव्यांग कायदा २०१६ ची कठोर अंमलबजावणी करून दिव्यांगाना न्याय हक्क देण्यात यावा असे खालील मांगण्याचे निवेदन देण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री यांनी दिव्यांग,वृध्द,निराधाराना न्याय देण्याचे अश्वासन दिले.

1)   दिव्यांग कायदा 2016 ची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकारी याच्यावर कडक कार्यवाहि करावी, 2 दिव्यांगाना सर्व सामान्य जनतेसारखे जीवन जगता यावे व  स्वबळावर व्यवसाय करण्यासाठी  आमदार दिव्यांग निधी दर वर्षी पंधरा लाख रुपये त्यांच्या मतदार संघात दिला तर त्यांना रस्तावर भिक मांगन्याची वेळ येणार नाही म्हणून त्यांना हक्क मिळावे म्हणून आपणच संसदेत कायदा पास करून तेच कायदा आमदार साहेब पाळत नसेल तर दिव्यांग कायदा चा उपयोग काय?

3) दिव्यांग, वृध्द निराधार याना अनेक योजनेचे तहसील मार्फत मिळणारे अनुदानात दोन वेळा चहा साठी दुध मिळत नाही तर ते एक हजार मानधनात महिनाभर कसे जिवन जगत असतील त्यांचा विचार करुन किमान जीवन जगण्यासाठी किमान वेतन प्रमाणे मानधनात दर महा पाच हजार रुपये वाढ करून ते वेळेवर दरमहा देण्यात यावे*

4) अंत्योदय राशन योजनेत दिव्यांग व्यक्तीला स्वतंत्रअंत्योदय  राशन व राशन कार्ड देण्याची शासनाने आदेश असुन  ते मिळत नाहि. 5) दिव्यांगाना अनेक कायदे शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यामुळे दिव्यांगासाठी स्वंतत्र मंत्रालय निर्मिती करून दिव्यांगाना हक्क द्यावा.

6) ज्या दिव्यांगाना चालता येत नाहि,आपले म्हणे मांडण्यासाठी बोलता येत नाहि,जगात काय चाले ते दिसत नाहि,ऐकु येत नाहि अशाना बस प्रवासात त्यांना व सोबतीला मोफत प्रवासाची सवलत देण्यात यावा.

7) दिव्यांगाना वृध्दाश्रम प्रत्येक जिल्यात स्थापन करण्यात यावे. 8) दिव्यांगाना राजकिय आरक्षण  व स्थानिक स्वराज्य कमिटीत सदस्य म्हणून निवड करण्यात यावे  ऊदा संजय गांधी निराधार योजना ईत्यादी निवड करावी.

10) दिव्यांग साहित्य व पायाभूत साधने शिबीर, नांदेड जिल्ह्यातील डिसेंबर 2019 मध्ये दिव्यांगासाठी पायाभूत साधने व साहित्य मोजमाप शिबीराचे आयोजन करून लाखो रुपये खर्च करण्यात येऊन अनेक दिव्यांगाना साहित्य आजहि पंचायत समितीने पुर्णपणे वाटप केले नसल्यामुळे शाळेच्या पटागणात गंजुन गेले आहे ते जर वेळेवर वाटप व्हावे म्हणुन अनेक वेळा तेरा निवेदन 

आंदोलन मोर्चा करूनहि दखल घेतली नाहि.ते आज हि सर्व पंचायत समितीत का पडुन गंज खात आहे आज पर्यंत दिव्यांगाना लाभ न देणाऱ्या अधिकारी यांच्यावर कार्यवाहि करावी साहितची रक्कम वसुल करावी.

  11)  दिव्यांग बांधवाना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका, महानगर पालिका पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये दिव्यांगाचा पाच टक्के निधी दरवर्षी का देण्यात येत नाही न देणार्‍या अधिकारी यांच्या वर कडक कारवाई करावी.

12) म. ग्रा.रो.ह.योजनेत दिव्यांगाला काम मिळेना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दिव्यांगाला दरवर्षी  किमान 100 दिवस गावातच रोजगार देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ते मिळत नाहि. 13) दिव्यांगाला स्वयंरोजगारा साठी जागा गावातील शासकिय व निमशासकीय कार्यालयीन परिसरात दिव्यांगाला स्वयं रोजगारासाठी 200 स्केअफुट जागा देण्याचा आद असुंन मिळत नाहि.

14) दिव्यांग बाधवाना घरकुल योजनेत प्राधान्य म्हणून  पाच टक्के प्रमाणे घरकुल मिळावे असेही दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. सोडऊन दिनदुबळ्या दिव्यांगाना न्याय द्यावा असे निवेदण दिले त्यावेळी संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल, जि.अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, दिंगाबर लोणे,सचिन कुंटुरकर, तेजपालसिंग,ईत्यादी कार्यकरत्ये ऊपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी