नविन नांदेड। सम्राट अशोक विजयादशमी व ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्त आयोजक नागेश कांबळे शाखा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे यांच्या वतीने खिरदान व महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिका धम्मदिक्षा वाहुळे पुसद लातुरकर यांच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला,या ऊपसिथीत मान्यवरांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
३० आक्टोबंर रोजी महात्मा फुले शाळेचा मैदान पंचशिल नगर बळीरामपुर येथे सम्राट अशोक व विजयादशमी निमित्त खिरदान व भिमगितांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उद्घाटक वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहेमद, महाराष्ट्र सदस्य युवा आघाडीचे अक्षय बनसोडे, राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी, युवानेते सुदर्शन कांचनगिरे,शिवाभाऊ नंरगले,प्रशांत इंगोले, राजेश्वर हतीअंबीरे,वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, तालुका अध्यक्ष विनायक गजभारे,रवि पंडित, अँड वैभव लषकरे,अमृत नंरगलकर,किशन गव्हाणे,रवि भंडारे, राहुल डोईबळे, नितीन गायकवाड,आकाश चिते, दुर्गा बाई दांडगे, कस्तुराबाई कपाळे, गंगाबाई सरोदे,भिमराव श्रावणे, शोभाबाई बुधदे,दता कांबळे,आंनदा वने,गौतम दुथाडे,प्रलहाद पारडे,आंनदराव वने,सिधदोन कापसीकर,अनिल डोईबळे, व्यंकटी शिनगारपुळे,उमेश राज झलारे,सचिन कदम, अमोल शिरसे, यांच्या सह मान्यवरांच्यी उपस्थिती होती.
यावेळी ऊपसिथीत मान्यवरांच्या सत्कार सोहळा आयोजक नागेश कांबळे व संयोजन समितीचे मारोती डोईबळे,दया श्रावणे,विशाल चावरे, रमाकांत झलारे, रोहीत व अंबटवार यांनी केला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन पर भाषणे करून आयोजक व संयोजन समितीचे कौतुक केले. महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिका धम्मदिक्षा वाहुळे पुसद यांनी तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन चरित्र आधारित गाजलेली अनेक भिम गित गायन केले, यावेळी बळीरामपुर परिसरातील महिला युवक जेष्ठ नागरिक यांच्यी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.