वामनराव विष्णुपूरीकर यांची पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी
नवीन नांदेड| नवीन नांदेड येथील श्री संत रोहिदास महाराज मंदिर तिर्थक्षेत्र वर्ग क प्रस्तावित वर्ग ब हे शासन ग्राम विकास विभाग यांच्या अधिपत्याखाली आहे. यास्तव चार दशका खालील प्रस्तुत तिर्थक्षेत्राचा विकास सततच्या पाठपुराव्यानंतर सुद्धा अत्यंत संथगतीने होत आहे. सदरच्या तिर्थक्षेत्राचे गुरु महाराज त्याचप्रमाणे ट्रस्टचे सर्वच विश्वस्त हे सुद्धा अनुसूचित जातीतील दलित समाजातून असल्या कारणाने प्रस्तुत तिर्थक्षेत्र हे शासनाच्या ग्राम विकास विभागाकडून सामाजिक न्याय विभागाकडे वर्ग करण्यात यावे.
ज्यामुळे प्रस्तुत तिर्थक्षेत्राचा जलदगतीने विकास होईल यासह इतर मागण्यांचे निवेदन राज्याचे ग्राम विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांना त्यांच्या नांदेड जिल्हा दौर्यात शासकीय विश्रामगृह येथे सदर तिर्थक्षेत्राचे संस्थापक सचिव वामनराव मे. विष्णुपूरीकर यांनी दिले. यावेळी प्रमुख विश्वस्त अशोक लाटकर हेही उपस्थित होते. दरम्यान ना. गिरीश महाजन यांनी याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे समस्त चर्मकार समाजात आनंदाचे वातावरण पसरले असून तिर्थक्षेत्राच्या विकासाला लवकरच चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.