पदवीधर सिनेट निवडणुकीचे मतदान केंद्र जाहीर -NNL


नांदेड|
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांमध्ये सिनेट निवडणुक घेण्यात येणार आहे. नोंदणीकृत पदवीधर गटामधून अधिसभेवर एकूण १० उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. खुला गटामधून ५, अनुसूचित जातीमधून १,अनुसूचित जमाती मधून १, विमुक्त भटक्या जमातीमधून १, इतर मागास प्रवर्गातून १ आणि महिलामधून १ असे १० पदवीधर सिनेटसाठी निवडून द्यावयाचे आहेत. यासाठी परिक्षेत्रातील ३४मतदान केंद्रावर दि. १३ नोव्हेंबर रोजी स. ८:०० ते ५:०० या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे. 

नांदेड मधील यादीनुसार मतदान क्र. १०९०ते ११९९ चे मतदान किनवट येथील बळीराम पाटील महाविद्यालय येथे होणार आहे. त्यानुसार २३६९ ते २५४९देगलूर महाविद्यालय, २५५० ते २६१७दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, भोकर, २९६७ ते ३४८३के.आर.एम. महिला महाविद्यालय नांदेड, ४८७९ ते ५३८३नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड, ५६०९ते ५७४८ हुतात्मा पानसरे महाविद्यालय अर्जापूर,५७४९ ते ६४५४प्रतिभा निकेतन महाविद्यालय नांदेड, ७०३४ ते ७२८१ शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालय मुखेड, ७२८२ ते ७५४०शरदचंद्र महाविद्यालय नायगाव, ८२६३ ते८४०४ श्री. शिवाजी महाविद्यालय कंधार, ९८७१ते १०९४४ यशवंत महाविद्यालय नांदेड या केंद्रावर वर दिलेल्या यादीतील मतदान क्रमांकानुसार मतदान होणार आहे. 

आदर्श महाविद्यालय हिंगोली येथे यादीतील मतदान क्र.१ ते ४२५ पर्यंतचे यादीनुसार मतदान होणार आहे. बहिर्जी स्मारक वसमत येथे ४२६ ते १०८९आणि स्व. डॉ. शंकरराव सातव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कळमनुरी येथे २८१८ ते २९६६पर्यंतचे या केंद्रावर वर दिलेल्या यादीतील मतदान क्रमांकानुसार मतदान होणार आहे. 

परभणी जिल्ह्यामधील ज्ञानोपासक महाविद्यालय जिंतूर येथे २६१८ ते २८१७,के.के.एम. महाविद्यालय मानवत येथे ३४८४ ते ३७५५,नूतन महाविद्यालय, सेलू ५३८४ ते ५६०८,संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड ६८२७ ते ७०३३,श्री. शिवाजी लॉ कॉलेज, परभणी येथे ७७६० ते ८२६२, श्री. शिवाजी महाविद्यालय परभणी येथे ८४०५ ते ९३५५,सौ. कमलाताई जामकर महिला महाविद्यालय परभणी येथे ९३५६ते ९५९६,स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय, पूर्णा येथे ९५९७ ते ९८७०पर्यंतचे या केंद्रावर वर दिलेल्या यादीतील मतदान क्रमांकानुसार मतदान होणार आहे. 

लातूर जिल्ह्यामध्ये भाई किशनराव देशमुख महाविद्यालय, चाकूर येथे १२००ते १४५७, दयानंद सायन्स महाविद्यालय, लातूर येथे १४५८ ते २३६८, महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा येथे ३७५६ते ३९१७, महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर येथे ३९१८ ते ४८७८,राजश्री शाहू महाविद्यालय, लातूर येथे ६४५५ते ६८२६, शिवाजी महाविद्यालय,उदगीर येथे ७५४१ ते ७७५९पर्यंतचे या केंद्रावर वर दिलेल्या यादीतील मतदान क्रमांकानुसार मतदान होणार आहे. 

मतदारांनी मतदानासाठी जाताना नियोक्त्यांनी दिलेले ओळखपत्र, आधार कार्ड, निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र, पारपत्र, वाहन चालवण्याचा फोटो असलेला परवाना, यापैकी एक सोबत आणावे, असे विद्यापीठाचे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सर्जेराव शिंदे यांनी कळविले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी