काँग्रेस आय नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने भारत जोडो यात्रेचे स्वागत,व भव्य सत्कार सोहळा -NNL


नविन नांदेड।
भारत जोडो अभियान अंतर्गत खासदार राहुल गांधी यांची पदयात्रा आज सकाळी ७.३० वाजता जवाहरनगर तुप्पा येथे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस आय दक्षिण विधानसभा मतदारसंघा तर्फे आमदार मोहनराव हंबर्डे व

पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने भव्यदिव्य स्वागत वारकारी वेषभुषा मध्ये करण्यात येणार असुन या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन आ.हंबर्डे यांनी केले असून सहभागी असणाऱ्या नागरीकांना तुप्पा पाटी नजीक जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

भारत जोडो अभियान अंतर्गत आज १० नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात ही पदयात्रा दाखल होणार असून खासदार राहुल गांधी यांच्या  वारकरी वेशभूषा मध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, आमदार मोहनराव हंबर्डे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा व सहभागी मान्यवरांच्या उपस्थितीत आ‌. मोहनराव हंबर्डे, जिल्हा परिषद सदस्य, मनोहर पाटील शिंदे, गंगाप्रसाद काकडे व पं, स. सदस्य,यांच्या सह कांकाडी, बळीरामपुर, तुप्पा,वाजेगाव, धनेगाव,भायेगाव,व परिसरातील अनेक गावांतील संरपच ऊपसंरपच, ग्रामपंचायत सदस्य, व काँग्रेस आय नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या कडून वारकरी वेषात खासदार राहुल गांधी यांच्या फेटा बांधुन व विणा देऊन भव्यदिव्य सत्कार सोहळा व स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला असून या सोहळ्याला दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ.मोहनराव हंबर्डे यांनी केले आहे.

जागोजागी ग्रामस्थ व पदाधिकारी यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात येणार आहे तर औधोगिक वसाहतीतील सिप्टा कारखाना येथे तिनं तास विश्रांती घेतल्या नंतर नांदेड येथील नवा मोढा येथील सभेसाठी खासदार राहुल गांधी व सोबत असलेले पदाधिकारी रवाना होणार आहेत, वाजेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय चा वतीने वाजेगाव चौक येथे ग्रामपंचायत कार्यालय वाजेगाव नांदेडचा उपसभापती अब्दुल वतीने फईम ,संरपच शेख जमील व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी यांच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे.

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने जवळपास कांकाडी ते चंदासिग चौक , धनेगाव,वाजेगाव ,देगलुर नाका व नांदेड शहरात दुतर्फा रोडवर व मध्यभागी भारत जोडो यात्रेचे अभिनंदन करणारे फलक, काँग्रेस पक्षाचे ध्वज,कमानी उभारण्यात आल्या आहेत.

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या वतीने तुप्पा पाटी नजीक पाच एकर मैदानावर पदयात्रा मध्ये सहभागी  असणाऱ्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून या पदयात्रा मध्ये जास्ती जास्त ग्रामस्थ, नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सहभागी होण्याचे आवाहन आ. हंबर्डे यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी