मौजे आमदरीवाडी येथे ज्येष्ठ नागरिक व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत बिरसा मुंडा चौक येथे अभिवादन करण्यात आले तर भोकर शहरातील एसटी महामंडळ आगार येथेही कंट्रोलर हनुमंत वागतकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन करण्यात आले. आश्रम शाळा, भोसी येथे मुख्याध्यापक संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तर आश्रम शाळा सिताखांडी येथे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी अभिवादन केले.
बोरवाडी येथे युवकांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले तर वाकद, ताटकळवाडी, बाबनवाडी, आमदरी नवीन, झिंगारवाडी, नारवट, आमदरी, गारगोट वाडीसह शाळा,महाविद्यालय आणि ग्रामपंचायत कार्यालयात महानायकाला जयंती दिनी १५ नोव्हेंबर रोजी अभिवादन करण्यात आले.
आदिवासी समाजाचे अधुरे स्वप्न
भोकर शहरात आदिवासी मुला-मुलींसाठी शासनाच्या जागेत वस्तीग्रह इमारतीचे बांधकाम, भोकर शहरात बिरसा मुंडा यांचा भव्य पुतळा व बोरवाडी गावात सांस्कृतिक सभागृह आणि डोरली येथे भव्य डॅम ही कामे आजपर्यंत होणे अपेक्षित होते पण ती स्वप्नवत राहिली असल्याची खंत समाजात व्यक्त होत आहे.