नविन नांदेड। वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण महानगर अंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्र.20 अंतर्गत राहुल नगर वाघळा येथील नवीन कार्यकारिणी गठीत व नामफलका चे अनावरण वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश प्रवक्ते फारूक अहेमद यांच्या व महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड यांच्या हस्ते १३ नोव्हेंबर रोजी उदघाट्न करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्याम कांबळे, सुभाष डोंगरे, रवी पंडित, अमृत नरंगलकर,प्रा विनायक गजभारे,संजना गायकवाड, विद्यानंद पवळे,सुदर्शन कांचनगिरे,डॉ सिद्धार्थ भेदे, मारुती डोईबळे, सिद्धार्थ पवार, नंदकुमार गच्चे, श्यामराव कांबळे, वॉर्ड अध्यक्ष शिवाजी कांबळे, राजू ढवळे, धम्मा गोपाळे संजय निळेकर, सुरेश पवळे, राजू जमदाडे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते, यावेळी प्रथम भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाणा पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
प्रमुख पाहुण्याचा राहुलनगर वासियांकडून सत्कार करण्यात आला व नवीन कार्यकारिणी महानगर चे महासचिव अमृत नरंगलकर यांनी खालील प्रमाणे घोषित केली अध्यक्ष शिवाजी कांबळे, महासचिव बालाजी ढवळे, उपाध्यक्ष विलास ढवळे, गोरखनाथ शिंदे, सचिव राघोजी वाघमारे, सह सचिव मोतीराम गायकवाड, मारोती गायकवाड, कोषाध्यक्ष किशन वावळे, प्रशिद्धी प्रमुख भगवान हाणवते, संघटक माधव वाघमारे, मल्हारी जोंधळे, गणपत सरोदे, सहसंघटक अच्युत ढवळे, अरविंद सोनवले, केशव गायकवाड, सदस्य किशन जमदाडे, धनेश चौदंते, चंदू वाघमारे इत्यादी पदाधिकारी यांच्या नावाची घोषणा केली.
यावेळी फारुख अहेमद, विठ्ठल गायकवाड, श्याम कांबळे,रवी पंडित, विनायक गजभारे, सुभाष डोंगरे, यांनी पक्षाचे ध्यय व बाळासाहेब साहेब आंबेडकर यांचे आगामी काळात हात बळकट करण्याचे आव्हान उपस्तितांना केले या कार्यक्रमा चे प्रसत्ताविक राघोबा वाघमारे यांनी तर सूत्र संचलन राजू ढवळे यांनी तर आभार प्रदर्शन धम्मा गोपाळे यांनी केले यावेळी नगरातील शेकडो महिला, युवक पुरुष उपस्थित होते.