नांदेड। मराठवाडा स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १३ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता टाकळगाव ता.लोहा कवी संमेलन आयोजित केले होते.
या कवी संमेलनात उदघाटन (शुभारंभ) उत्तमरावजी भदाडे माजी सरचिटणीस ग्रामसेवक संघटना लातूर यांचे हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले, संमेलनाचे अध्यक्ष म्हणून एन.डी.राठोड होते. सुत्रसंचलन टि.व्ही.स्टार राजेसाहेबजी कदम यांनी केले. प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित असलेले अरुण घोडसे पाटील(कृषी अधिकारी जि.प.नांदेड) यांनी ऊत्कृष्ट गिते गावून ,कवी संमेलनात प्रक्षेकांची मने जिंकली.
तसेच ईयत्ता चौथी मध्ये शिकत असलेली कु.विद्याश्री येमचे यांनी उत्कृष्ट नृत्य केले. या संमेलनात निमंत्रीत कवी प्रा.भगवान आमलापूरे,प्रा.अनिल चवळे,बालाजी मुंढे, प्रफुल धामणगावकर, वैजनाथ गित्ते,शिवा कराड, शिवाजी नामपल्ले,विजय पवार, बाबाराव विश्वकर्मा,अरविंद जगताप, कवियत्री वर्षा माळी,मीना तौर,रंजना गायकवाड यांनी अनेक कवीता म्हणून प्रक्षेकांची मने जिंकली. या वेळी ग्रामविकास अधिकारी अमृत शिंदे हे उपस्थित होते. या संमेलनाचे आयोजन सरपंच भिमराव लामदाडे यांनी केले होते,या संमेलनास गावातील बहुसंख्येंने पुरुष व महिला रसिकानी लाभ घेतला.