खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या गटाचे वर्चस्व
उस्माननगर,माणिक भिसे। उस्माननगर येथून जवळच असलेल्या लोहा तालुक्यातील मौजे जोशीसांगवी येथील सेवासहकारी सोसायटीच्या प्रशासकीय चेअरमन म्हणून सौ.सुवर्णा संजय मोरे यांची निवड करण्यात आली.
लोहा तालुक्यातील नियमित नियतनमान कालावधी संपल्या व निवडणूका न झालेल्या लोहा तालुक्यातील जोशीसांगवीची निवड झाली नव्हती म्हणून या गावच्या सेवा सहकारी सोसायटीच्या प्रशासकीय मंडळावर नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपले वजन वापरून जोशीसांगवी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा समर्थक संजय पाटील मोरे यांच्या पत्नी सौ.सुवर्णा संजय मोरे याची निवड करण्यात आली.
भाजपचे नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष, कार्यसम्राट खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मंत्रालयस्तरावर वजन वापरून विरोधकांच्या गटाला बाजूला ठेवून आपल्याच ताब्यात ठेवण्यात यश संपादन केले. या निवडीमध्ये सौ.सुवर्णा संजय मोरे ( प्रशासकीय चेअरमन )बबन बाबाराव मोरे,बाळासाहेब बाबाराव मोरे,दिगंबर मोतीराम पोकले, दिगंबर जळबा भुसेवाड, भगवान माधवराव गजभारे,नामदेव बालाजी मोरे यांची प्रशासकीय सदस्य पदी निवड करण्यात आली. यास नांदेड जिल्ह्याचे भाग्यविधाते ,लोकनेते,लोकप्रिय खासदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्य प्रणिता देवरे - चिखलीकर, देविदास राठोड, लोहा पंचायत समिती सभापती आनंदराव पाटील शिंदे,भाजपा कार्यकर्ते सुरेश मामा बास्टे,संजय मोरे नियुक्ती पत्र देण्यात आले व नविन चेअरमन, सदस्य यांचा यथोचित सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.