शाळा पातळीवरील गरजांची निश्चिती करणारा यु-डायस व्यवस्थित भरावा- शिक्षणाधिकारी डॉ सविता बिरगे -NNL


नांदेड।
कार्य निर्देशांक, निपुण भारत, समग्र शिक्षा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषयतज्ञ आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर यांची एकदिवसीय कार्यशाळा आज नांदेड येथे संपन्न झाली. या कार्यशाळेत प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगे आणि माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी या संदर्भातील सखोल माहिती दिली.

शाळा स्तरावरील वास्तविक स्थिती आणि गरजांची निश्चिती करण्यासाठी यु-डायस फॉर्म भरून घेण्यात येतो. यात सर्व पद्धतीच्या नोंदी करण्यात येतात. या नोंदी व्यवस्थित आणि वास्तव पद्धतीच्या झाल्या तर जिल्ह्याचा निर्देशांक वरच्या पातळीवर जाऊन जिल्हा मानांकित होऊ शकतो यासाठी गट आणि शाळा स्तरावरील मुख्याध्यापकांनी विशेषत्वाने काळजी घेऊन युडायस भरणे आवश्यक असते, त्यामुळे या संबंधी अतिशय काळजीने काम करण्याचे आवाहन प्राथमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी केले. या संदर्भातील अत्यंत सूक्ष्म अशी माहिती या कार्यशाळेत सर्वांना देण्यात आली. शिक्षणाधिकारी सविता बिरगे, प्रशांत दिग्रसकर उपशिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, बंडू अमदुरकर, शिक्षण विस्तार अधिकारी संतोष शेटकार, के.ए. काझी, दादाराव शिरसाठ, अर्चना बागवाले, आदींनी यावेळी विविध उपक्रमांची माहिती सांगितली.
      
स्थलांतरित होणारी मुले आणि त्यांचे सर्वेक्षण, हंगामी वस्तीगृह सुरू करणे, पीजीआय इंडिकेटर, 25% प्रवेश, अनधिकृत शाळा, शिष्यवृत्ती, मानव विकास मिशन, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा ग्रंथालय, विभागीय आयुक्तांचा त्यांचे फ्लॅगशिप कार्यक्रम आदींबद्दल या कार्यशाळेत माहिती देण्यात आली. तालुका स्तरावर चालू असलेल्या उपक्रमांचे सादरीकरण गटशिक्षणाधिकारी यांनी केले. यावेळी लोहा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांची शिक्षणाधिकारी या पदावर पदोन्नती झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यशाळेत तालुका स्तरावरील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख, विषय तज्ञ उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी