माजी मंत्री अमित विलासराव देशमुखांची साखर कारखान्याच्या माध्यमातू नांदेड जिल्ह्यात इन्ट्री -NNL


नांदेड|
एका तपापुर्वी कलंबर साखर कारखाना घेण्याच्या राजकारण झाले आणि स्व विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली   कलंबर सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर चालविण्यासाठी निविदा भरल्या होत्या व पुढे राज्यात नेतृत्व बदल झाले. "भाऊराव "साखर कारखान्याने "कलंबर" भाडे तत्वावर घेतला पण तो सुरूच झाला नाही. त्यानंतर तब्बल १४ वर्षानंतर स्व विलासराव यांच्या पश्चात आ. अमित देशमुख यांनी लोहा तालुक्यातील जामगा शिवणी येथील धाराशिव साखर कारखाना.ट्वेंटी वन शुगर्स लिमिटेडने घेतला या युनिटच्या कारखान्याच्या आ. देशमुख यांची नांदेड जिल्ह्यात इन्ट्री झाली आहे.

नांदेड-लातूर असा कधी उघड तर कधी सुप्त असा राजकीय संघर्ष दीर्घकाळ सुरू होता. स्व विलासराव देशमुख यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्या नंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अशोकराव चव्हाण यांच्याकडे राज्याचे नेतृत्व आले. त्यावेळी ताटात सांडले काय अन वाटीत सांडले  काय एकच..!  असे या नेतृत्व बदलाचे वर्णन करण्यात आले होते. पण दोन्ही नेतृत्वात सुप्त संघर्ष सुरू होता. आयुक्त कार्यालयावरून वाद आणखी वाढला.

पण पुढे लोकसभा निवडणुकीत लातूरचे उमेदवार जयवंतराव आवळे लोहा -कंधार विधानसभा मतदारसंघात प्रचंड पिछाडीवर गेले होते. स्व विलासराव व जिल्ह्याचे खा. प्रतापराव पाटील यांच्यातील संबंधाचा तो परिणाम मानला गेला .भाजपाचे" कमळ " त्या निवडणूकीत आघाडीवर होते. आणि त्यानंतर सलग तीन निवडणुकीत ते काय..? राहिला हा योगायोगच.

पुढे खूप काही राजकीय घडामोडी घडत गेल्या. स्व विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर लातूर -नांदेड हा राजकीय संघर्ष थांबला. प्रतापराव यांनी काँगेस पक्ष सोडला. लोहा नगर पालिका निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण विरुद्ध प्रतापराव अशी लढत असते. त्यामुळे निवडणूक काळात आ. अमित देशमुख यांना प्रतापरावांच्या विरुद्ध प्रचारासाठी नेहमीच आणले जाते. तर माळेगाव यात्रेत स्व विलासराव देशमुख यांचा घोडा येत असते. स्वतः आ धीरज देशमुख हे अश्व प्रदर्शन ठेवतात या काळात चिखलीकर कुटुंब त्याच्या सोबत असते. स्वतः प्रवीण पाटील हे यात्रा काळात आ. धीरज देशमुख व सहकारी यांच्या सोबत असतात म्हणजे राजकारण बाजूला ठेवून दोन्ही कुटुंबातील संबंध कायम आहेत. 

आता तर लोहा तालुक्यातील जमगा शिवणी येथे ट्वेन्टी वन शुगर्सच्या निमित्ताने आ अमित भैया देशमुख यांची लोहा तालुक्यात पर्यायाने जिल्ह्यात इन्ट्री झाली आहे. १४ वर्षा पूर्वी कलंबर साखर कारखाना भाडे तत्वावर घेण्याची प्रक्रिया तत्कालीन राजकीय घडामोडीमुळे पूर्णत्वाकडे गेली नाही. पण त्या काळात भाऊराव साखर कारखान्याचे कलंबर भाडे तत्वावर घेतला आणि निवडणूक झाली की न चालविता भाडे करार रद्द केला. पण जमगा शिवणी चा साखर कारखाना देशमुख बंधूनी घेतला त्यामुळे या भागातील ऊस उत्पादक यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यशस्वी साखर कारखाना चालविण्याचा अनुभव तसेच राजकीय बडे प्रस्थत शिवाय शेतकऱ्याच्या हिताला प्राधान्य त्यामुळे ऊस उत्पादक  शेतकऱ्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. 

कारखाना भागातील रस्ते अद्यापही चांगले नाही ते चांगले होतील. शेतकऱ्यांना अधिकचा भाव मिळेल अशी अपेक्षा आहे. गोदावरी नदी व लिंबोटी धरणामुळे या भागात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस लागवड अधिक केली. भाव अधिकचा मिळेल असा अपेक्षा वाढल्या आहेत. 

खा. प्रतापराव पाटील यांच्या होम ग्राउंडवर हा कारखाना आहे. शिवाय त्यांच्या लोकसभा मतदार संघात येतो तसेच  पक्षीय दृष्टीकोन बाजूला ठेवून त्यांची वेळोवेळी मदत होईल. तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा हा जिल्हा त्यामुळे त्यांचेही सहकार्य मिळणार आहे .धाराशिवच्या तुलनेत ट्वेन्टी वन शुगर्स अधिक चांगल्या क्षमतेने चालेल असा विश्वास ऊस उत्पादक याना वाटतो. या साखर कारखान्याच्या निमित्ताने चौदा वर्षा पूर्वी कलंबर साखर कारखाना भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय पूर्णत्वास जाऊ शकला नसला तरी स्वतःच्या मालकीचा साखर कारखाना उभा राहिला आहे. त्यांची साखर  कारखान्याच्या निमित्ताने  जिल्ह्यात इन्ट्री झाली त्यामुळे संपर्क वाढणार आहे. 


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी