संग्रहित छायाचित्र |
हिमायतगार, अनिल मादसवार| मागील दोन दिवसापासून हिमायतनगर तालुक्यातील वडगाव - गणेशवाडी परिसरात बिबट्याचा वावर होत असल्याचे माहिती पसरली. दरम्यान गणेशवाडी शिवारात कापूस वेचणाऱ्या एका शेतकऱ्यावर बिबट्याने काल दुपारी २ च्या सुमारास अचानक हल्ला केला. दरम्यान शेतकऱ्याने आरडाओरडा केली असता आजूबाजूचे शेतकरी धावून आल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. यात बाबाराव ब्रम्हाजी ढोले हा शेतकरी बालंबाल बचावला आहे.
या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने दाखल होऊन वन्यजीव संरक्षक कट्टी याना पाचारण करून बिबट्याला दि.०७ नोव्हेंबरच्या रात्रीला पिंजऱ्यात कैद करण्यात आले आहे. त्या बिबट्याला भोकर येथून नागपूरच्या वनाधिवासात सोडण्यासाठी नेण्यात येत असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापासून हिमायतनगर - तेलंगणा बॉर्डरच्या जंगल परिसरात बिबट्याचा मुक्त संचार होत असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले होते.
दरम्यान आज दि.०९ रोजी बिबट्याला भोकर येथे नेण्यात आल्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील वडगाव - गणेशवाडी परिसरातील शेतकरी, मजुरदार व नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. याबाबत वनविभागाच्या कार्यालयात जाऊन माहिती घेतली असता भोकर येथून त्या बिबट्याला नागपूर येथील वन अधिवासात नेऊन सोडले जाणार असल्याचे सांगितले.