हिमायतनगरातील ती... माधी बिबट आजारी; उपचार करून नागपूर येथे पाठविले -NNL


हिमायतनगर, अनिल मादसवार|
हिमायतनगर तालुक्यातील जिरोना - गणेशवाडी परिसरात काल आढळलेला तो बिबट्या मादी जातीचा असून, आजारी असलयाचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. आजारी असल्यामुळे बिबट्या एकाच ठिकाणी बसून होता, त्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र याची माहिती मिळताच वनविभागाने तात्काळ घटनास्थळ दाखल होऊन वन्यजीव रक्षकच्या मदतीने बिबटला दोरीच्या साहाय्याने पकडून पिंजऱ्यात टाकून नेण्यात आले आहे. तत्पूर्वी त्याच्यावर उपचार करण्यात आले असून, नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.  

याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार नांदेड वनविभागा अंतर्गत वनपरिक्षेत्र कार्यालय  हिमायतनगर (प्रा.) मधील नियतक्षेत्र वाशी मधील जिरोना परिसरात साधारण तीन वर्ष वयाच्या (माधी) बिबट मालकी शिवारात असल्याचे आढळले. दिनांक 07-11-2022 रोजी 03 वाजेच्या दरम्यान बिबट वण्यप्राणी असल्याचे शेतकरी व गावकऱ्यांनी वन विभागाला दुरध्वनी द्वारे कळविल्यानंतर घटनास्थळी उप वनसंरक्षक नांदेड केशव वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बी.एन.ठाकूर सहायक वन संरक्षक नांदेड वनपरिक्षेत्र अधिकारी हिमायतनगर बालाजी चव्हाण, मानद वन्यजीव रक्षक अतींद्र कट्टी, पशु वैद्यकीय अधिकारी हिमायतनगर सोनटक्के व वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.


घटनास्थळावर आजारी अवस्थेत असलेला वण्यप्राणी बिबट हालचाल करत नसल्याने सदर बिबटला दोरीच्या / जाळीच्या साह्याने पकडून पिंजऱ्यामध्ये घेऊन नारवट येथे प्रथम उपचार केले. पुढील उपचारासाठी टी.टी.सी. नागपूर येथे सदर बिबट्याला दिनांक 08-11-2022 रोजी पाठविण्यात आले आहे. सदर कार्यवाही मध्ये वनपाल अमोल कदम, सुनिल मेटकर, विभूते मॅडम वनरक्षक गिते, खलसे, अमृतवार, केंद्रे इस्लापूर, वनपाल देशमुख, इस्लापूर वनपरिक्षेत्राचे वनरक्षक नागरगोजे, घायाळ, सय्यद, वनमजूर अहेमद व पोलिस पाटील वामन जाधव माझी सरपंच गावकरी व आकाश चव्हाण ( कॉम्प्युटर ऑ.) राहूल राठोड ( वाहनचालक) उपस्थीत होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी