नविन नांदेड। भारत जोडो अभियान अंतर्गत खासदार राहुल गांधी हे नांदेड तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत १० नोव्हेंबर रोजी प्रवेश करत असुन, त्या अनुषंगाने मुख्य मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. सिप्टा कारखाना येथील परिसरात वास्तव्य असल्याने कडेकोट पोलिस बंदोबस्त सह पार्किंग, फिक्स पाईटं,प्रेक्षक बंदोबस्त ,प्रेट्रोलींग बंदोबस्त लावण्यात आला आहे.
भारत जोडो अभियान अंतर्गत नांदेड तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत १० नोव्हेंबर रोजी पदयात्रा आगमन होणार असुन जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्ण कोकाटे, पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सिध्देश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असून मुख्य मार्ग वाहतुकीसाठी बंद केला असून जवळपास ३०० पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, होमगार्ड यांच्यी बंदोबस्त साठी नियुक्ती केली आहे.
तिनं ठिकाणी वाहन पार्किंग तळ करण्यात आले असून १० नोव्हेंबर रोजी सिप्टा कारखाना येथे खासदार राहुल गांधी व सोबत असलेले पदाधिकारी हे विश्रांती साठी जेवणासाठी तिनं तास थांबणार असुन रोड ,प्रेट्रोलींग,प्रेक्षक पाईंट, फिक्स बंदोबस्त साठी बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती गोपनीय शाखेचे पोलिस अंमलदार बालाजी दंतापल्ले यांनी दिली.