पुणे| राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, संचालक तथा अध्यक्ष, ताण तणाव समिती आनंद भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आयोजित केलेल्या ग्रामसेवकाकडील अतिरिक्त कामे कमी करणे या मागणीचा अनुषंगाने अंतिम अहवाल सादर करण्याच्या दृष्टीने गठित समितीची बैठक यशदा पुणे येथे पार पडली.
सदर बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेच्या वतीने ग्रामसेवकांवरील अतिरिक्त कामाचा ताण व त्यावरील उपाययोजना या बाबतचा अभ्यासपूर्ण ड्राफ्ट संघटनेचे प्रतिनिधी तथा राज्य कार्याध्यक्ष नवनाथ झोळ यांनी उपस्थित राहून बैठकीत चर्चा करून सादर केला. याअगोदरही संघटनेच्या वतीने समितीकडे निवेदनाद्वारे अहवाल सादर केलेला होता. या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, सचिन घाटगे, समिती सदस्य सचिव तथा (उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जिल्हा परिषद, पुणे, सदस्य कमलाकर रणदिवे उपमुख्य कार्यकारी( साप्रवी) जी प पुणे, सदस्य माननीय मनोज जाधव, ( उपमुख्य कार्यकारी अधिकारी समिती सदस्य तथा संचालक, यशदा तसेच सर्व ग्रामसेवक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सदर निवेदनाची इतिवृतात नोंद घेन्यात आली असून गठित समिती मार्फत लवकरच शासनाकडे अंतिम अहवाल सादर करण्यात येईल असे आश्वासन समिती अध्यक्षांनी दिले. सदर ड्राफ्ट संघटनेच्या वतीने तयार करताना राज्याध्यक्ष नितीन धामणे, राज्य सचिव हरिश्चंद्र काळे यांच्या सूचनेनुसार गुगल फॉर्म द्वारे लिंक तयार करून संवर्ग बांधवांचे अभिप्राय मागविले होते. याकरिता राज्यातील अनेक अभ्यासू ग्रामसेवकांनी आपले अभिप्राय नोंदवीले होते. सदर अभिप्रायावर जिल्हाध्यक्ष मधुकर मुंगल, जिल्हाध्यक्ष नारायण पवार, कोषाध्यक्ष महेंद्र निकम, सचिन शिंदे, विभागीय अध्यक्ष विलास ढेंगे यांनी अभ्यास करून निष्कर्ष अहवाल तयार करून संघटनेकडे सादर केलेला होता.