नांदेड| संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री तथा देशाचे माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज दर्शन घेतले. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी माथा टेकून अभिवादन केले.
राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा देशाच्या संरक्षणाचा सह्याद्री म्हणून ओळखल्या गेलेले स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या सातारा जिल्ह्यातील कराड येथील समाधीचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज दर्शन घेतले. एका खाजगी कामानिमित्त खा. चिखलीकर हे कराड येथे गेले असता त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन केले.
यावेळी सेवानिवृत्त साखर संचालक गायकवाड ,प्रणव चौधरी, उद्योजक गुलाब शुक्ला , संकेत शहा, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव सावळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यशवंतराव चव्हाण यांच्या दणकट कार्यामुळे देशाच्या संरक्षणाला सह्याद्री सारखे बळकटीकरण आले होते असे गौरवउद्गार खा. चिखलीकर यांनी यावेळी काढले.