हिमायतनगर शहरालगतच्या नाल्यात गाळ - झुडपे वाढल्याने शहराला पुराच्या धोक्याची शक्यता -NNL

नाला खोलीकरण व सरळीकरण करून शहराला सुरक्षा देण्याची मागणी  



हिमायतनगर, अनिल मादसवार| रेल्वेस्थानक रस्त्यावरील शहरालगत असलेल्या विसावा बारजवळील ओढ्यात बेश्रमाच्या झाडांनी व इतर झुडपांनी आक्रमण केल्यामुळे संपूर्ण नाला बेश्रममय झाला आहे. हि बाब लक्षात घेता वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यास अडथळा निर्माण होऊन, शहराला पुराचा मोठा धोका होऊ नये यासाठी नगरपंचायतीने तातडीने वाढलेली झाडेझुडपे, नाल्यातील गाळ बेशरमास हटउन पाण्याचा मार्ग मोकळा करावा अन्यथा शहरात पुराचे पाणी येऊन इमारतीला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत आहे.

हिमायतनगर शहर हे तेलंगाना - विदर्भाच्या सीमेवर आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या - जाण्याऱ्याची नेहमीच वर्दळ असते. शहरात येणारा नांदेड - किनवट राष्ट्रीय मार्गावरील शहराला लागून असलेला विसावा बार जवळ मोठा ओढा आहे. याच ओढ्याच्या पुलावरून रेल्वे स्थानक, भोकर, हदगाव, नांदेडकडे जाण्याचा मार्ग आहे. येथील रेल्वे कोर्नर्वरिल ओढ्यात व संपूर्ण परिसराला बेश्रमाच्या झाडांनी व इतर झुडपांनी व्यापले आहे. त्यामुळे नजर जाईल तिथपर्यंत बेश्रमाचीच हिरवीगार झाडे दिसत असून, याच नाल्याला पावसाळ्यात मोठापूर येउन संपूर्ण गावाला वेढा पडतो. याचा अनुभव सन २००६, २००८ च्या सालात झालेल्या अतिवृष्टीत वाहनधारक, नागरिक व शहरवासियांना आला होता. त्यावेळी तब्बल ५ ते ६ तास वाहतूक ठप्प झाली होती, तर अनेकांच्या घरात पाणी शिरून वाहने वाहून जाऊन मोठे नुकसान सुद्धा झाले होते. 



यास कारण ठरले ते बेश्रामाने व्यापलेला परिसर कारण त्या वाढलेल्या झाडाझुडपामुळे पावसाचे पाणी थेट ओढ्यातून वाहून जाण्याऐवजी संपूर्ण परिसरात पसरून सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. याच नाल्यात पाणी जमा राहून पुढे मार्ग नसल्याने शहरातील रहिम कॉलनी, उमर चौक, रुख्मिणी नगर, दत्तनगर परिसरातील नूतन वस्तीत शिरले होते. त्यामुळे तोच प्रकार सध्या सुरु झालेल्या पावसाळ्यात निर्माण होण्याची शक्यता असून, अतिवृष्टीच्या पावसामुळे शहरातील इमारती व सर्वसामान्यांच्या घरात पाणी घुसून नुकसान अथवा इमारतीला धोका होऊ शकतो. कारण कालपरवाच झालेल्या धुंवाधार पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते, त्यामुळे अनेक रस्त्यावर तासनतास पाणी साचून होते तयार काही भागात अनेकांच्या घरात पाणी गेल्याने रोटर जागून काढावी लागली होती. 

तेंव्हा आगामी पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने वारावीला आहे, पुढील काळात उद्भवणाऱ्या पावसाच्या पाण्यापासूनच शहराचा धोका टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. कारण स्थानिक नगरपंचायत प्रशासनाचे शहरातील समस्यांकडे दुर्लक्षच झालेले आहे. त्यामुले बोगस कामाचे पितळे उघडे पडले असून, केवळ मलिदा लाटण्यासाठी स्थानिक प्रशासन व स्वतःला विकास पुरुष म्हणून घेणारे गाव पुढारी नेहमी पुढे पुढे करता. मात्र शहरात निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष देण्याच्या वेळी बिळात बसून राहतात. अश्या कर्तबगारा मुळेहिमायतनगर शहरात गटारगंगा निर्माण झाली असून, संभाव्य धोका टाळण्यासाठी जिलाधिकारी डॉ.विपीन, उपजिल्हाधिकारी जीवराज डापकर यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत जुन्या जानकारानि व्यक्त केले आहे.



मागल्या काळात माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी नियोजन समितीच्या बैठकीत या नाल्याचा   प्रश्न उपस्थित करून यासाठी १५ लाखाचा निधी मंजूर करून घेतला होता. त्यामुळे शहरवासीय व प्रवाशी वर्गातून समाधान मानले होते, परंतु अद्याप नाला सरळीकरणाचे काम झाले नसल्याने संबंधित विभागाने हे कमी पूर्ण केल्याचे दाखवून निधी परस्पर उचलून घेऊन नालासरळीकरनाचे काम रखडत ठेवल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता तालुक्यातील जवळगावचे माधवराव पाटील हे आमदार आहेत, किमान त्यांनी तरी या नाल्याच्या समस्येकडे लक्ष देऊन शहराला होणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत सतर्कता बाळगून नाल्याचे सरळीकरण व त्यामधे वारंवार वाढणाऱ्या झुडपाबद्दल संबंधित विभागाच्या अधिकार्यांना आदेशित करून धोका टाळावा अशी रास्त अपेक्षा गावकरी व्यक्त करत आहेत. 

शुभारंभ होऊन ६ वर्ष लोटले.. काम मात्र झालेच नाही...!

जलसंधारण व कृषी विभागाच्या एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमातून जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पावसाची पाणी जमिनीत झिरपून पाणी पातळी वाढविण्यासाठी आणि रेल्वे स्थानकाला जाणार्या नागरिकांना दुर्गंधीपासून कायमची मुक्ती देण्यासाठी १५ लाखाचा निधी मंजूर झाला होता. याच निधीतून तालुका कृषी अधिकारी कार्यालय हिमायतनगर मार्फत नाला खोलीकरण व सरळीकरणाची जवळपास ३ मीटर खोली, ६०० मीटर लांबी आणि १३ मीटर रुंदीचे कामाचा शुभारंभ दि.१६ में २०१५ रोजी आ. नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते झाला होता. त्यानंतर जेसीबी आणून कामाला सुरुवात झाली त्यामुळे नाल्याची दुरुस्ती व बेशरमाचा वेढा काढून पावसाळ्यात वारंवार होणारी कटकट दूर होईल असे सर्वाना वाटले. मात्र नाला सरळीकरणाचे काम करताना आजू - बाजूच्या लोकांचे प्लॉटचे नुकसान होईल त्यामुळे हे काम रखडत ठेवल्या गेले. त्यामुळे आजही शहराला पुराच्या पावसाचा धोक्याची शक्यता जैस्थेचं आहे हे विशेष.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी