दिव्यांगाच्या प्रश्नासाठी पंचायत समिती नांदेडच्या ग्रामसेवक बैठकित तेरा निवेदनाची दखल न घेणाऱ्या हक्कापासुन वंचीत ठेवणाऱ्यावर कार्यवाहि करा चंपतराव डाकोरे -NNL


नांदेड।
नांदेड पंचायत समिती सभागृह येधे दिव्यांग वृध्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल, गटविकास अधिकारी,विस्तार अधिकारी ,ग्रामविकास  अधिकारी यांच्या ऊपस्थित बैठक संपन्न झाली.

या बैठकित संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरेज्ञपाटिल यांनी डीसें. 2019 मध्ये दिव्यांग वयोवृध्दाना साहित्य शिबिरात तपासणी करून त्यांचे लाभार्थी मिळत नाहित,व साहित्य नेत नाहि असे म्हणाऱ्या अधिकारी यांच्यासमोर शेकडो लाभार्थी यांचा पुरावाच दिला,तेंव्हा गटविकास अधिकारी यांनी दिव्यांगाचे साहित्य पंचायत समिती नांदेड यांनी जबाबदारी नाहि जर वरीष्ठाने जबाबदारी दिली व यादी दिली तर तात्काळ वाटप करण्याचे अश्वासन दिले.

2) दिव्यांग बांधवाना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये दिव्यांगाचा पाच टक्के निधी दरवर्षी का देण्यात येत नाही न देणार्‍या अधिकारी यांच्या वर कडक कारवाई करीत नाहि तेंव्हा गटविकास अधिकारी यांना सक्तहताकिद देऊन पंधरा दिवसात निधी वाटप करण्याचे आदेश दिले.

3.दिव्यांग मित्र अप नांदेड - दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या समाज कल्याण विभागाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व सुविधा दिव्यांगाला घरपोच मिळण्या करीता दिव्यांग मित्र अप नांदेड ची निर्मिती नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री व माजीजिल्हाधिकारी नांदेड यांनी केली व एकही दिव्यांग वंचित राहू नये वेळेचे बंधन करून अध्याप अंमलबजावणी का झाली नाहि याबदल बैठकित आदेश दिले.

5) म. ग्रा.रो.ह.योजनेत दिव्यांगाला काम मिळेना - महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दिव्यांगाला दरवर्षी  किमान 100 दिवस गावातच रोजगार देण्याची तरतूद करण्यात आली आहे. आपल्या तालुक्यातील किती गावात दिव्यांगाना काम किंव्हा बेरोजगार भता देण्यात आला किंव्हा नाहि दिला तर त्यांचे कारणासहित दिव्यांग लाभार्थी यादीसहित माहिती देण्यात यावी.

6) दिव्यांगाला स्वयंरोज गारासाठी जागा - गावातील शासकिय व निमशासकीय कार्यालयात व कार्यालयीन परिसरात दिव्यांगाला स्वयं रोजगारासाठी 200 स्केअर फुट जागा देण्याबाबत शासन निर्णय व परिपत्रक काढण्यात आले आहे. आपल्या कार्यालयासहित किती ग्रामपंचायत ने दिव्यांगाना जागा देऊन  किती दिव्यांगाना आधार दिला जर दिला नसेल तर कारणासहित लाभार्थी यादीसहित माहिती त्वरीत देण्यात यावी.

7) दिव्यांग बाधवाना घरकुल योजनेत प्राधान्य म्हणून पाच टक्के प्रमाणे घरकुल- आपल्या तालुक्यात किती गावात दिव्यांगाना लाभ देण्यात आला व नाहि दिला तर त्यांच्या कारणासहित लाभार्थी यादव देण्यात यावी. वरील सर्व मुध्देसुध्द चर्चा करुन न्याय देण्याचे अश्वासन दिले. या बैठकिस विस्तारअधिकारी, ग्रामसेवक,ग्रामपंचायत ऑफरेटर दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले,समदानी शेख,शिवाजी हंबर्डे,साई कांबळे,शेरखान पठाण ईत्यादी कार्यकर्ते ऊपस्थित होते

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी