नांदेड। 1990 मध्ये अयोध्या येथे राम मंदिर आंदोलनासाठी जी कारसेवा झाली त्यामध्ये कोठारी बंधू (राम कोठारी, शरद कोठारी )यांनी जे बलिदान दिले त्यांच्या बलिदान दीना निमित्त दर वर्षी विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे सम्पूर्ण भारतभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.
नांदेड मध्ये कोठारी बंधू (राम कोठारी, शरद कोठारी )यांच्या बलिदान दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक 6 नोव्हेंबर रविवार रोजी सकाळी 10 वाजता पंचवटी मंदिर जवळ , महावीर चौक येथे भव्य रक्तदान शिबिराचे व विहिप हितचिंतक अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे आवाहन करण्यात येते कि ज्या कोठारी बंधूने आपले रक्त हिंदू धर्मासाठी, प्रभु रामासाठी वाहिले आहे त्याची जाणीव राखून आपण ह्या भव्य रक्तदान शिबीर मध्ये रक्तदान करून आपले कर्तव्य पार पाडावे.