नांदेड। शहरात दुकान फोडीचे सत्र चालूच असून एकाच दिवशी पाच शटर फोडण्याचा विक्रम करून पोलिसांच्या अस्तीत्ववर प्रश्न निर्माण केलेला असतांनाच लगेचच रविवार दि ६ नोव्हेंबर २०२२ च्या रात्री वजिराबाद पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चिखलवाडी चौकातील मुख्य रस्त्यावरील प्रसाद इलेक्ट्रोनिक्स ह्या दुकानाचे शटर विविध अवजारांच्या सहाय्याने वाकवून दुकानाच्या आत प्रवेश करून आतील ६० ते 70 किलो वजनाच्या ईन्व्ह्टरसाठी लागणाऱ्या वजनदार नऊ बॅटऱ्या व दोन ईन्व्ह्टर चोरट्यांनी चोरून नेले आहे. पोलीस स्टेशनच्या बाजूच्या मुख्य रस्त्यावरील दुकान फोडून चोरट्यांनी पोलिसासमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
एक बॅटरी उचलण्यासाठी कमीतकमी दोन माणसांची गरज पडते अश्या नऊ बॅटरी ज्यांचें अंदाजे वजन ७०० ते ८०० आहे. अश्या अवजड बॅटऱ्या चोरट्यांनी नेल्या कश्या हा सगळ्यात मोठा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. एवढ्या अवजड बॅटऱ्या नेण्यासाठी चोरट्यांनी एखाद्या मोठ्या सामान नेणाऱ्या वाहनाचा वापर केलेला असण्याची शक्यता आहे. तसेच शटर फोडण्यासाठी मोठमोठे अवजार वापरलेले असणार आहेत. शहरात पोलिसांची रात्रीची गस्त चालू असतांना चोरटे एवढे सामान घेऊन शहरातील मुख्य रस्त्यावर कसे काय फिरू शकतात असा व्यापारी वर्गाला प्रश्न पडलेला आहे व यामुळेच पोलिसांच्या शहरातील अस्तित्वावर प्रश्न निर्माण झालेला आहे.
वजिराबाद पोलीस स्टेशनला लागून असलेल्या व मुख्य रस्त्याच्या चौकात असलेले दुकान फोडून झालेल्या चोरी मुळे शहरातील व्यापारी वर्गात प्रचंड दहशत पसरलेली असून, सर्व व्यापारी वर्गत असुरक्षिततेची भावना पसरलेली आहे. करोना महामारीनंतर आलेल्या मंदीमुळे व ऑननलाईन होत असलेल्या खरेदीमुळे सर्वसाधारण व्यापारी आधीच मरणासन्न अवस्थेत असतांना अश्या प्रकारे होणाऱ्या चोऱ्यांमुळे व्यापाऱ्यांचे संपूर्ण कंबरडे मोडल्या जात आहे. शटर फोडून चोरी करणाऱ्या टोळीचा तात्काळ बंदोबस्त करून व्यापाऱ्यांना दिलासा देण्याची मागणी सर्व व्यापारी वर्गाने पोलिसांकडे करत आहेत.
वजिराबाद पोलीस स्टेशन येथे फिर्यादी आनंद कृष्णापुरकर 9422874328 व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी रात्रीच्या वेळी दुकान फोडून चोरी केल्याबाबत कलम ४५७ व कलम ३८७ नुसार गुन्हा ( गुन्हा क्र ३९६/२०२२ ) दाखल केलेला आहे.