महावितरण अधिकाऱ्यांची ठेकेदार आणि कर्मचाऱ्यावर वचक नसल्याने वीजपुरवठ्याच्या समस्या सुटता सुटेना -NNL

ठेकेदाराची मनमानीला व लाईनमच्या नाकर्तेपणाचा ग्राहकांना बसतोय फटका 
सवना ज येथील सरपंच परमेश्वर गोपतवाड यांनी कार्यकारी अभियंता संजीवकुमार चितळे याना पत्र पाठवून केली समस्यां सोडविण्याची मागणी 


हिमायतनगर, अनिल मादसवार|
हिमायतनगर येथील उपकार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंत्याची कर्मचाऱ्यावर वचक नसल्यामुळे आणि महावितरणची कामे करणाऱ्या ठेकेदाराच्या मन्मनीमुळे गेल्या अनेक महिन्यापासून सवना गावातील तसेच तालुक्यातील वीजपुरवठ्याच्या समस्या सुटण्या ऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहेत. या बाबत अनेकदा माहिती देऊनही समस्या सुटता नसल्याने चक्क सवना ज येथील सरपंच परमेश्वर गोपतवाड यांनी कार्यकारी अभियंता संजीवकुमार चितळे याना पत्र पाठवून सुरळीत वीज पुरवठ्यासाठी सर्व डीपीवर सामान भर द्यावा आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बांधकानाक करावे अशी मागणी केली आहे.

हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, एकीकडे विदर्भ तर दुसरीकडे तेलंगणा बॉर्डर आहे. या भागात उद्योग नसल्यामुळे बहुतांश नागरिक शेतकरी व मजुरी करून आपला घरगाडा चालवितात. दिवसभर काम कारण रात्रीला घरात निवांत झोपायचे म्हंटले तर महावितरणचा वीजपुरवठा वॉर्नर खंडित होतो आहे. तसेच विजेचा भार कमी -अधिक होऊन काही ठिकाणी स्पार्किंग होणे, विजेवर चालणारी यंत्रे जाळून जाणे, रात्रभर अंधारात काढावी लागणे, एका भागात वीजपुरवठा तर एका भागात अंधार अश्या विविध समस्यांनी डोके वर काढले आहे. यात भर म्हणून शासनाकडून दुरुस्तीसाठी मंजूर झालेली कामे करण्यात होत असलेली संबंधित ठेकेदारांची मनमानी आणि रिडींग घेणाऱ्या ठेकेदारांचा नाकर्तेपणा यामुळे अव्वाच्या सव्वा देयके येत असल्याने आर्थिक भुर्दंडही सोसावा लागतो आहे. 


या सर्व समस्या नित्याच्याच झाल्या असून, डीपी जळाल्यानंतर त्यालाही १० ते १५ दिवस लागतात. तो बसविला कि नाही सुसरीचं समस्या सुरु होते. समस्या झाली कि नागराईक संबंधित लाईनमन अथवा हिमायतनगर येथील अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क करतात. मात्र महावितरणचे अधिकारी - कर्मचारी फोन उचलत नाहीत त्यामुळे नाईलाजाने वरिष्ठाना संपर्क करावा लागतो आहे. त्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील विजेच्या समस्या कधी सुटणार..? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारात आहेत. अशीच अवस्था सवना ज गावाची झाली त्यामुळे हैराण झालेल्या येथील सरपंच परमेश्वर गोपतवाड यांनी सोमवारी सायंकाळी विजवितरण कंपनी विभागीय कार्यालय भोकरचे कार्यकारी अभियंता संजीवकुमार चितळे यांना मॅसेज पाठविल्यानंतर सहायक अभियंता पवन भंडगे यांनी रात्रीं ७ वा लाईनमेन ऐवजी गावातील खाजगी व्यक्तीला पाठवून वीज पुरवठा सुर्लिट करायला लावला आहे. यामुळे येथील लाईनमनवर अधिकाऱ्याची वचक नाही का असा प्रश्न समोर येतो आहे.

सवना येथील नानाजी आनंदराव गोपेवाड पाटील यांनी अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून सवना ज. गाव उजेडात आणला परंतु र्थी फ्युज वीजपुरवठा सुरु झालाच नाही. त्यामुळे मंगळवार दि.१ नोव्हेंबर रोजी सकाळी पाच पासुन विज पुरवठा पुर्ण खंडीत झाला आहे त्यामुळे पाठविलेल्या पत्रात गोपतवाड यांनी अधिकाऱ्यास नम्र विनंती केली आहे की, हिमायतनगर सबस्टेशन कडुन सुरळीत विज पुरवठा सवना ज. गावापर्यंत आहे. मात्र गावातील १०० च्या डी.पी.वरुन समान लोड नसल्यामुळे फ्युज टीकेना झाले आहेत. त्यामुळे हिमायतनगर येथील उपकार्यकारी अभियंता नागेश लोणे आणि पवन भडंगे यांना सांगुन सवना (ज.) येथील र्थी फ्युज वीजपुरवठा सुरळीत चालू करण्यासाठी सांगावे असे पात्रात लिहिले आहे. यावरून हिमायतनगर येथील महावितरण कार्यालयात खेळखंडोबा चालत असल्याचे उघडपणे दिसते आहे.

सवना (ज.) येथील र्थी फ्युज वीजपुरवठा सुर्लिट चालू राहण्यासाठी अगोदर तिन फ्युजवर असलेला अधिकच लोड कमी करून इतर ठिकाणी डीवायडेड करुन समान करणे गरजेचे आहे. केबल आणि फ्युज बसविने सुद्धा गरजेचे आहे. असेही पात्रात म्हंटले आहे. त्यांनी हे पात्राच्या प्रतिलीपी योग्य कार्यवाही साठी लोकनेते आ.माधवरावजी पाटील जवळगावकर, अतिरिक्त कार्यकारी अनुपकुमार तंबाके, विज वितरण कंपनी, उपकार्यकारी अभियंता उपविभागीय कार्यालय हिमायतनगरचे नागेश लोणे, संबंधित एजंसी आणि सवना ज येथील सर्व ग्रामस्थांच्या माहितीसाठी वाटसप या सोशल माडीयावर टाकले आहे. 

तसेच त्यांनी गावातील लोका देखील विनंती केली आहे कि, कोणी डायरेक्ट आकोडे टाकुन विज पुरवठा घेत असेल त्यांनी असे ना करता शासनाला सहकार्य करून अधिकुत वीजपुरवठा घ्यावा कारण अधिकारी गावात येण्याची शक्यता आहे. आणि हनुमान डि.पी.वरुन र्थी फ्युज विजपुरवठा मंगळवारी १ नोव्हेंबर रोजी विज वितरण कंपनीकडून कुठल्याही परिस्थितीत आपल्या गावकरी बांधवांच्या सहकार्याने सुर्लिट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. डी.पी.च्या खालील बॉक्स, फ्युज नविनच चार दिवसांत येईल यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्याची चुणूक दाखविणे आणि वीजपुरवठ्याची समस्या दूर करून कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यावर वचक ठेवणे आवश्यक असल्याचंही त्यांनी एक प्रकारे या माध्यमातून संदेश दिला आहे.

एकूणच हिमायतनगर शहरातील अःवितारं कार्यालयातून चालत असलेल्या कारभारावर अंकुश लागून अधिकारी - कर्मचारी वसुलीप्रमाणे वीजपुरवठा सुरळीत आणि सुरक्षित देण्यासाठी प्रयत्न करतील का..? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी