या मेळाव्याचे उद्घाटन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त, नांदेड मा. तेजस माळवतकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च शिक्षण संचालक डॉ. विठ्ठल मोरे हे राहणार आहेत तसेच मराठवाडयातील राजकिय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहूणे म्हणून राहणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार सितले यांनी प्रसिद्धिपत्रकान्वये दिली आहे.
दिनांक ६ नोव्हेंबर २०२२ रोजी देवकृपा फंक्शन हॉल, छत्रपती चौक, नांदेड येथे राज्यस्तरिय बौद्ध वधू-वर पालक परिचय महामेळाव्याचे आयोजन लोकजनजागृती बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. या मेळाव्यात महाराष्ट्रातीव बौध्द समाजातील विवाह ईच्छुक तरुण, तरुणी, घटस्फोटित, विधवा व विधुर हे त्यांच्या पालकांसमेवत महामेळावासाठी येणार आहेत. या महामेळाव्याचे उदघाटन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त, नांदेड मा. तेजस माळवतकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च शिक्षण सहसंचालक,नांदेड मा. डाॅ..विठ्ठल मोरे हे लाभणार आहेत.
तसेच परभणीचे जिल्हाध्यक्ष सुधिर कांबळे, परळी वैजनाथ येथील समाजसेवक प्रा. चिंतामन खंडागळे, परभणीचे नगरसेवक आकाश लहाणे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष कांटकांबळे, बलिरामपुर नांदेड चे सरपंच अमोल गोडबोले, उद्योजक गंगाधर बेलुरकर, सामाजिक कार्यकते प्रदिप वावळे, संजय सारणीकर, राष्ट्रवादी कॉग्रेस चे जिल्हा उ पाध्यक्ष बंटी लांडगे, नगरसेवक बाळुभाऊ राऊत, सुभाष रायबोले, संदिप सोनकांबळे, सामाजिक कार्यकर्त सत्यपाल सावंत, देविदास वाघमारे, प्रा. राजु सोनसळे, नागेश सितळे, रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा अध्यक्ष माधव जमदाडे, जिल्हाध्यक्ष संदिप मांजरमकर, कुमार कुतंडीकर, वंचित बहुजन आघाडिचे मराठवाडा सदस्य डॉ. संघरल कुन्डे,
डॉ. मिलिंद पांडुणीकर, डॉ. राजेश पाईकराव, सामाजिक कार्यकर्ते के. एस. सोनाळे, भगवान कंधारे, सदाशिव गजभारे, डॉ. योगेश पारखे, अॅड. धम्मपाल कदम, दलित सेनेचे राज्य संघटक संजय वाघमारे, जिल्हाध्यक्ष किशन गव्हाणे, पत्रकार राजु जोंधळे, वंचित बहुजन आघाडी हिंगोलीचे जिल्हाउपाध्यक्ष रवीकुमार पंडित, यशवंत पंडित, मारोती पंडित, युवा कॉग्रेस हिंगोली वे तुषार पंडित, रिपाई आठवले नांदेड चे जेष्ठ नेते शरद सोनवणे, प्राचार्य विकास कदम, वंचित बहुजन आघाडी नांदेडचे जिल्हाउपाध्यक्ष रवि पंडित यांच्यासह सामाजिक व राज्यकिय क्षेत्रातील नेते उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यास जास्तित जास्त बौध्द समाजातील विवाहयोग्य तरुण तरुणींनी उपस्थित राहावे असे आवाहन सुचक समितीचे राहुल पुंडगे, विलास वाघमारे, रमाकांत बनसोडे, गौतम वाघमारे, मिलिंद मुळे, सुंदर जानराव, लोणे गुरुजी, आशा पाटिल, हेमा कांबळे, पंचशिला सितळे आदिनी केले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार सितळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्ये दिली आहे. तसेच या मेळाव्यात नोदणी करण्यासाठी ७६२०७६ १९९९ या नंबरवर संपर्क साधावा असे आवहान सुवक संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.