नांदेड| प्लेटफॉर्म क्रमांक 4 येत असलेली सचखंड एक्स्प्रेस हि प्लेटफॉर्म क्रमांक एक वर घेण्यात यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल श्रीरामजी कुल्थिया यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
रेल्वे क्रमांक 12716 ही प्लेटफॉर्म क्रमांक 4 वर दरोज येते आहे. या रेल्वेने मोठ्या संखेत गुरद्वारा सचखंड साहेबच्या दर्शनासाठी श्रद्धालु पंजाब हुन येतात. प्लेटफॉर्म क्रमांक 4 च्या दिशेने उतरलेले भाविकांना गोकुळ नगरच्या दिशेने बाहेर पडावे लागते आहे. त्या भागातुन श्रद्धालु याना लांबच्या प्रवासामुळे अजुन जास्त त्रास होतो आहे. हि बाब लक्षात घेता तातडीने सचखंड एक्सप्रेस प्लेटफॉर्म क्रमांक एक वर घेण्यात यावी.
यामुळे शहर वाहतूक व इतर प्रवासी याना सुद्धा त्रास होणार नाही. एक नंबर वरुण एक्सिट गेट गुरुद्वारा जाण्यासाठी फार जास्त सोयस्कर आहे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल श्रीरामजी कुल्थिया यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाच्या प्रति त्यांनी खासदार प्रताप पाटिल चिखलिकर, श्री गुरद्वारा साहेब नांदेड़ बोर्ड, प्रवीण साले भाजपा अध्यक्ष नांदेड़ जिल्हा महानगर आणि रेल्वे विभागाला दिले आहे.