हिमायतनगर शहरातील हमाल- कामगार मजुरांनी एकत्र येणे काळाची गरज आहे - श्री सूर्यकांत स्वामी -NNL

हक्कासाठी लढा द्यायचा असले तर सर्व मजुरांनी संघटित होऊन काम करायला हवे  


हिमायतनगर, अनिल मादसवार|
शेतकरी आणि व्यापारी आपले अन्नदाता या सर्वाना आपण कुणीही त्रास द्यायचा नाही. जर आपणास कुणी त्रास देत असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही. त्यासाठी सर्व हमाल, मजुरांनी संघटित होऊन एकमेकांच्या हक्कासाठी लढायला हवे. आपण विस्कळीत आहोंत म्हणून याचा फाय व्यापारी घेतात. संघटित असलेल्यामध्ये फूट पाडण्याचे काम करतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे शिका... संघटित व्हा... आणि संघर्ष करा... या नीतीचा अर्थ समजून घेतला पाहिजे. आज भारत स्वतंत्र झाला मात्र अजूनही आपण गुलामगिरीत आहोत. खरे स्वातंत्र्य अजूनही आपल्याला भेटले नाही. आपल्यावर दबाव टाकून अधिकार गाजविला जातो... ते सांगितले ते काम आपण करतो म्हणून आपल्या भोळेपणाचा ते फायदा घेतात. आपण केलेल्या घामाचे मोल मिळाले पाहिजे त्यासाठी सर्वानी एकत्र येणे काळजी गरज आहे. असे प्रतिपादन हमाल - मापाडी संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष श्री सूर्यकांत स्वामी केले.   

ते हिमायतनगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात दि.१० ऑकटोबर रोजी संपन्न झालेल्या महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार सल्लागार संघटनेच्या बैठकीत उपस्थित  झालेल्या सर्व कामगारांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी मंचावर कृउबाचे सभापती डॉ.प्रकाश वानखेडे, सचिन नागोराव माने, मापाडी संघाचे शेषेराव गरड, नांदेड शासकीय नवा मोंढाचे मुकादम चंद्रकांत कोलते, रावसाहेब कांबळे, कृउबाचे लिपिक हिलाल भाई, नांदेड न्यूज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार, पत्रकार सय्यद मनानं, आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी हिमायतनगर येथील हमाल, मापाडी कामगारांच्या वतीने मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पहाराने स्वागत सन्मान करण्यात आला. यावेळी नांदेड, वसमत येथील आलेल्या मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. यावेळी पुढे बोलताना श्री स्वामी म्हणाले कि, सर्वानी एकत्र व्हावा, कोणींहि कोणावर अन्याय करू नये, हमाल मापाडी याना व्यापाऱ्यांनी सन्मान द्यावा, योग्य ती आणि सर्वाना समान मजुरी मिळणे गरजेचे आहे. सर्वच मजूर काम करतात, त्यामुळे सर्वाना सारखी मजुरी देणे बंधनकारक आहे.

संघटना म्हणजे व्यापाऱ्यांच्या विरोधात काम करायचे नाही, जर कुणावर अन्याय झाला तर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेचे काम असते. हमालांना आणखी व्यापाऱ्यांनी ओळखलेले नाही, सर्वाना समान काम आणि समान दाम मिळाले पाहिजे. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने मजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी भूमिका घ्यायला पाहिजे. तसेच ज्यांना परवाना नाही त्यांना परवाना काढून द्यावा. यासह सर्व अधिकाराचा वापर व्यापारी आणि मजुरदाराना न्याय मिळवून देण्यासाठी मार्केट कमिटीने करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


स्थानिक मजूर उपलब्ध असताना बाहेरहून मजूर आणून येथे लादल्या जाऊ नये. जेणे करून कामगारांचा उद्र्क होऊन याचे परिणाम व्यापाऱ्यांना भोगावे लागतील. माथाडी व हमाल संघटना मजुरांच्या न्याय हक्कासाठी लढणारी आहे. याचे महत्व समजून घेऊन सर्व मजुरांनी संघटित होऊन संघटना स्थापन करावी. याचे भरपूर फायदे भविष्यकाळात मजुरांना व त्यांच्या कुटुंबियांना मिळतील. संघटनेत काम करताना अडचणीत येतील त्याला तोंड देत सर्वानी काम करावा. यात कोणतीही अडचण आल्यास जिल्हा संघटना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असे अभिवाचनही श्री स्वामी यांनी सर्व मजुरांना दिले. यावेळी मुकादम शे.एजाज शे. कलाम, हमाल शेख पाशा, शेख बबलू, पठाण जिलानी, शेख युनूस, शेख फतरू, शेख बशीर यांनी उपस्थ मान्यवरांचा स्वागत केले. हि बैठक यशस्वी करण्यासाठी शहरातील सर्व हमाल मापाडी मजुरांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी