नांदेड। बिलोली येथील प्रसिद्ध व्यापारी तथा माजी नगरसेवक श्री विठ्ठलराव रायकंटवार यांच्या सौभाग्यवती कै.रुक्मिणबाई विठ्ठलराव रायकंटवार यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने बिलोली तालुक्यातील 30 गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 2100 विद्यार्थ्यांना वही, पेन व खाऊ वाटप करण्यात आले.
श्री विठ्ठलराव रायकंटवार यांचे पुत्र तथा आडत व्यापारी असोसिएशनचे बिलोली तालुका अध्यक्ष श्री अनुदत्त विठ्ठलराव रायकंटवार हे नेहमी सामाजिक कार्यात सदैव तत्पर असतात. आपण समाजाचं काही तरी देणं लागतो हा उद्दात भाव डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपल्या आईच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या गोरगरीबांच्या लेकरांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करुन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
यात अर्जापूर, सुलतानपूर, बावलगाव, बाभळी, कार्ला (बू.) नवीन, कार्ला (बू.) जुने, कार्ला (खू.) नवे, कार्ला (खू.)जुने, येसगी पू. गंजगाव, बोळेगाव, दौलतापूर, हिप्परगाथडी, अजणी, बडूर, हिंगणी, दर्यापूर, पोखर्णी, लघूळ जुने, लघूळ (पू.), नाग्यापूर, कोंडलापूर, सावळी, आरळी अबादी, आरळी, डौर, बेळकोणी बू. चिंचाळा, भोसी, दगडापूर, इत्यादी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या गोरगरीबांच्या मुलांना साहित्याचे वाटप करण्यात आले.
सदरील सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल माजी आमदार श्री सुभाषराव साबणे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री लक्ष्मणराव ठक्करवाड, सिमावर्तीयांचे मुख्य समन्वयक श्री गोविंदराव मुंडकर व गटशिक्षणाधिकारी श्री बी.एम.पाटील यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
याप्रसंगी अनुदत्त रायकंटवार, अनिल रायकंटवार, गोविंदराव मुंडकर, बालाजी गेंदेवाड, शिवकुमार सरकोंडावार, आदिनाथ गंगावार, सतीश बासटवार, गोविंदराव गंदाफुले, रामराम शेट्टीवार, जी.नागभूषन, बी. राजेश, संतोष चिकणेकर, लक्ष्मण रायकंटवार, प्रदीप कुंचेलीकर, सत्यजित तुप्तेवार, विठ्ठलराव रावजीवार, पांडुरंग गुरगुळकर, हाणमंतराव रामचंद्र, एकनाथ शिरगिरे, अनुप सरदेशपांडे, सतीश शिंदे, शांतेश्वर देसाई, यादव गोरले, प्रशांत जाधव, पाशाभाई नजीर अहेमद. आदि सहभागी झाले होते.