आदिवासी कोळी समाजाच्यावतीने महर्षी वाल्मीकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी -NNL


नांदेड|
अखिल भारतीय आदिवासी कोळी समाज संघटना नवी दिल्ली (रजि.) शाखा नांदेड जिल्ह्याच्या वतीने आद्य कवी रामायण ग्रंथाचे महाकाव्य रचनाकार महर्षी वाल्मिकी ऋषी यांची जयंती दि. ९ ऑक्टोंबर २०२२ रोजी सकाळी ठिक १२ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती, नवा मोंढा मैदान नांदेड येथे व्यंकट मुदीराज यांच्या नेतृत्वाखाली प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय आदिवासी कोळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. परेश कांतीभाई कोळी हे होते तर विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय उपाध्यक्ष महादेवबुवा शाहादाजकर, प्रदेश उपाध्यक्ष मारोती पाटील, कोषाध्यक्ष दत्ता मडवी, आरटीओ विकास नाईकवाडी, उद्योजक शशिकांत अण्णा भुसेवाड, संदीप अन्येबोईनवाड, केरबा जेठेवाड, ऍड. ओमजगदीश बोईनवाड, प्रदेशाध्यक्षा महिला आघाडी सौ. किरण पोन्ना, नांदेड जिल्हाध्यक्ष पुंडलीक मोरे, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, मुख्य संयोजक तथा मराठवाडा अध्यक्ष व्यंकट मुदीराज यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी संयोजक व्यंकट मुदीराज, पुंडलीक मोरे, प्रभाकर केंगल, गुणवंत मिसलवाड यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पहार शाल देऊन मंचावरील सर्व मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी वरील सर्व मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. शेवटी अध्यक्षीय समारोप परेश कांतीभाई कोळी यांनी केले. ते अध्यक्षीय समारोप करताना आपल्या भाषणात म्हणाले की, समाजाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी दि. १६ ऑक्टोंबर २०२२ रोजी समाजाचे जे केंद्रातील मंत्री आहेत त्यांच्याकडे बैठक लावली असून मराठवाड्यातील प्रलंबित मूळ प्रश्‍न म्हणजे जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी प्रमाणपत्र हे मुख्य प्रश्‍न सोडवण्यासाठी मी कटीबद्ध आहे असे ते म्हटले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यंकट मुदीराज यांनी केले तर सुत्रसंचलन गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले. आभार प्रदर्शन पुंडलीक मोरे यांनी मांडले. लगेचच उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन शोभायात्रेत सहभागी होऊन नवा मोंढा ते विष्णुनगर म. वाल्मिकी ऋषी मंदीरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली.

यावेळी रामदास कंदेवाड, सिद्धेश्‍वर पिटलेवाड, किशन गांगलेवाड, साहेबराव रेनेवाड, राजेश गट्टू, राजू पिंगलवाड, दादाराव कोठेवाड, राज मुदीराज, मारोती रेनेवाड, रमेश सोने, प्रल्हाद मद्देवाड, प्रल्हाद हानुमंते, भालचंद्र मोळके, परमेश्‍वर भिमलवाड, गिरीश गलांडे इत्यादी समाज बंधु- भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी