विस जुगाऱ्यांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
बिलोली/कासराली। गोपनीय माहितीच्या आधारे बिलोलीचे सहाय्यक पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या पथकाने दि.२८ आक्टोंबर च्या पहाटे पाच वाजताच्या सुमारास बिलोली तालुक्यातील कासराळी येथे जुगार अड्यावर धाड टाकली.या धाडीत २० जुगाऱ्यांसह पाच लक्ष ८० हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कार्यवाही बिलोली पोलीस स्टेशन कडून का होऊ शकली नाही.? असा असावा उपस्थित करण्यात येत आहे. मोकळ्या मैदानात खेळणारे उघड खेळ याबाबत स्थानिक पोलीस अनभिज्ञ कसे? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.
बिलोली पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कासराळी येथे मोठ्या संख्येने काही लोक पत्यावर जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती सहा.पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांना मिळाली.गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे चांडक यांनी नायगाव,रामतिर्थ व बिलोली पोलिसांची विविध पथके तयार केली.या पथकाने दि.२८ आक्टोंबर रोजी पहाटे सव्वा पाच वाजजेच्या सुमारास कासराळी येथील गावच्या बाहेर मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्यावर धाड टाकली.
मोठ्या शिताफीने टाकलेल्या या धाडीत एक लाख चार हजार रूपये नगद,७६ हजार रूपये किमतीचे मोबाईल,चार लाख रूपये किमतीचे अकरा दुचाकी वाहने असा एकूण ५ लाख ८० हजार रूपयांच्या मुद्देमालासह तब्बल २० जुगाऱ्यांना ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या आरोपींना बिलोली पोलिस स्थानकात पाठवून दोन टँक्टरच्या साह्याने अकरा दुचाकी वाहने आणण्यात आले.या प्रकरणी बिलोली पोलिस स्टेशनचे ए.पी.आय रामदास केंद्रे यांच्या तक्रारीवरून बिलोली पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या पथकातील कर्मचाऱ्यांनी मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्यावर धाड टाकून कार्यवाही करण्यात आली.
ही कार्यवाही पार पाडल्याबाबत चांडक यांनी सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. हे उत्तमच झाले पण पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे अशा प्रकरणाकडे कानाडोळा केल्या बाबत व , रात्रीची रेती चोरी प्रकरणात सदोष आढळल्यानंतरही कार्यवाही का करण्यात आली नाही ? उघड खेळणारे स्थानिक पोलिसांना कसे माहीत नव्हते? असा सवाल कासराळी येथील ग्रामस्थांकडून उपस्थित केल्या जात आहे..
सदर कारवाई सहाय्यक पोलिस अधिक्षक चांडक यांच्या मार्गादर्शनाखाली पोलिस निरिक्षक अभिषेक शिंदे,सहाय्यक पोलिस निरिक्षक संकेत दिघे,रामदास केंद्रे,बाचावार,शिंदे,केंद्रे,पोना सोनकांबळे आदींनी पार पाडली.