श्री. गुरुजी रुग्णालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन -NNL


नांदेड|
नांदेड शहरात सहकार तत्वावर उभारलेले 150 खाटांचे श्री. गुरुजी रुग्णालय, छत्रपती चौक, नांदेड गेल्या चार वर्षांपासून ICU,PICU, SICU, NICU, OT, SPECIAL ROOM, GENERAL WARD, PATHOLOGY LAB, SONOGRAPHY,HIMOFILEYA इ. सुविधांसह जनसेवेत कार्यरत असून, शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (PMJAY) येथे उपलब्ध आहेत. 

तसेच समाजातील सर्व  गरजू व मध्यमवर्गीय आणि गरीब रुग्णांना अत्यंत माफक दरात उच्चतम सेवा देण्यासाठी, रुग्णालयात सर्व व्याधी उपचारास्तव, तज्ञ व उच्चशिक्षित डाँक्टर] परिचारिका] तांत्रिक कुशल व सेवाभावी कर्मचारी वृंद, 24 तास अत्यावश्यक सेवा सुविधेसह उपलब्ध आहेत. 

रुग्णालयात तज्ञ व कुशल डाँक्टरांच्या मार्गदर्शनाखाली दि.30@10@2022 रोजी  स. 10%30 ते सायं. 5-00 पर्यंत श्री गुरुजी रुग्णालय, छत्रपती चौक,नांदेड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.तरी गरजूंनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन रुग्णालयाच्या व्यवस्थापना कडून करण्यात येत आहे. अधिक माहिती व नावनोंदणी साठी संपर्क:-9370638837 साधावा

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी