नविन नांदेड। भजन किर्तन पंरपरा प्राचीन काळापासून चालत आलेली वैचारिक पंरपरा असुन या माध्यमातून महाराष्टाला दिशा देण्याचे कार्य केले त्या माध्यमातून सामाजीक प्रबोधन करण्याचे कार्य अनेक थोर महात्म्यांनी केले असल्याचे सांगून ,आयोजक सतिश बसवदे यांनी हभप इंदुरीकर महाराज यांच्ये किर्तन अभिष्टचिंतन निमित्ताने ठेवून स्तुत्य उपक्रम राबविल्या बद्दल अभिनंदन केले.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने २७ आक्टोबंर रोजी सायंकाळी आठ वाजता हभप इंदुरकर महाराज यांच्या किर्तन कार्यक्रम आयोजन हडको येथील मैदानावर करण्यात होते ,या वेळी यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, आ.मोहनराव हंबर्डे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, महापौर जयश्री ताई पावडे, उपमहापौर अब्दुल गफार,काँग्रेसचे पक्ष पक्षप्रवकते संतोष पांडागळे, जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे,जिल्हा अध्यक्ष पप्पु पाटील कोढेकर, शहर अध्यक्ष विठ्ठल पावडे, नगरसेवक संदीप सोनकांबळे,श्रीनिवास जाधव, माजी नगरसेवक संजय इंगेवाड सिध्दार्थ गायकवाड, माजी नगरसेविका डॉ.करूणा जमदाडे, प्रा.ललीता शिंदे, रूपेश यादव,गोपी मुदीराज, अंबादास रातोळे, शशीकांत क्षिरसागर,यांच्या सह आजी माजी लोकप्रतिनिधी व ग्रामीण भागातील अनेक गावातील संरपच ,ऊपसंरपच , ग्रामपंचायत सदस्य , काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते , सिडको हडको परिसरासह ग्रामीण भागातील नागरिक महिला ,जेषठ नागरीक ,युवक भजनी मंडळ, वारकरी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा उल्लेख करून महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदाय माध्यमातून भजनी मंडळ व्दारे प्रबोधन करण्याचे काम अनेक संत मंडळी यांनी केले असल्याचे सांगितले, ७ नोव्हेंबर २२ रोजी भारत जोडो अभियान अंतर्गत राहुल गांधी यांच्यी पदयात्रेत मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले.
हभप.इंदुरीकर महाराज यांनी आजच्या युवक पिढीबधदल अनेक उदाहरणे देऊन आरोग्य सांभाळुन ताकद व संपत्तीचा योग्य वापर करावा व रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आवश्यक असल्याचे सांगून नात्या नात्यात निर्माण झालेला दुरावा योग्य नसल्याचे सांगितले. यावेळी भजन व किर्तन व्दारे ऊपसिथीत जनसमुदायाला सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक मधील अनेक उदाहरणे दिली व आरोग्य सांभाळा असे आवाहन केले.
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी लोकनेते अशोकराव चव्हाण यांनी केलेल्या विकासात्मक कामाचा आढावा देत अभिष्टचिंतन केले, कार्यक्रमाच्या प्रारंभी पवार गित संचाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुत्रसंचलन माधव डोमपले, चंद्रकांत मेकाले यांनी केले तर वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन साठी क्रेन चा साह्याने मोठा पुष्पहार व फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये केक कापून व भव्य सत्कार करून आयोजक मित्र मंडळ यांनी ऊपसिथीत मान्यवरांचा ऊपसिथीत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सत्कार केला.
या कार्यक्रमास कंधार,लोहा, नांदेड दक्षिण, उत्तर भागासह सिडको हडको परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा गुप्रचे पदाधिकारी व मित्र मंडळ पदाधिकारी यांनी सहकार्य केले तर ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.