नांदेड। लक्ष्मीबाई पुराणिक स्मृती पुरस्कार वितरण आणि प्रसिद्ध गायक सूरमणी धनंजय जोशी यांच्या नाट्य व भक्तीगीतांची मैफिल, शनिवारी (२९) सायंकाळी सहा वाजता, अशोक नगर हनुमान मंदीरात आयोजित करण्यात आली आहे.
हा कार्यक्रम नंदिग्राम संगीत सभा व स्वरतरंग प्रतिष्ठान नांदेड च्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात श्रीमती सीताभाभी राममोहनराव, श्री सुनील नेरलकर, डॉ श्री सुनील वझरकर, व गायक संजय जोशी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
या मैफिलीत सौ. अश्विनी आडे जोशी आणि सौ. सारिका अपस्तंब पांडे यांना अनुक्रमे २०२० व २०२१ चे, लक्ष्मीबाई पुराणिक स्मृती पुरस्कार वितरण करण्यात येणार आहेत. या निमित्ताने प्रसिद्ध गायक, सूरमणी धनंजय जोशी यांची नाट्य व भक्तीगीतांची मैफिल, आयोजित करण्यात आली आहे.
व्हायोलिन.. श्री पंकज शिरभाते, तबला.. श्री प्रशांत गाजरे, पखवाज.. श्री विश्वेश्वर कोलंबीकर, हार्मोनियम.. श्री मिहिर जोशी, मंजिरा.. श्री गिरीश देशमुख, यांची साथ असणार आहे, तर निवेदन श्री गोविंद पुराणिक व रवी नांदेडकर हे करणार आहेत. प्रवेश विनामूल्य असून रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन, नंदिग्राम संगीत सभा व स्वरतरंग प्रतिष्ठान नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.