नांदेड| महाबोधी बुद्ध विहार राऊतखेडा तालुका कंधार येथे दिनांक 20 ऑक्टोबर रोजी बुद्ध विहारात बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ठीक नऊ वाजता पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण महाउपासक डॉक्टर एस पी गायकवाड (संयोजक अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद महाविहार बावरी नगर दाभड नांदेड) यांच्या हस्ते होणार आहे.
तसेच निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण सौ दैवशाला संभाजी गरजे( उपसरपंच ग्रामपंचायत राऊतखेडा) यांच्या हस्ते होणार आहे. तर सकाळी दहा वाजता भिक्खू संघास भोजनदान व त्यानंतर सकाळी अकरा वाजता राऊतखेडा गावातील प्रमुख रस्त्याने भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच भिक्खू संघासह उपासक उपासिका यांच्या यांच्यासह मंगलमय वातावरणात गावातील प्रमुख रस्त्याने भव्य मिरवणूक निघणार आहे .दुपारी एक वाजता उपस्थित भिक्खू संघाची धम्मदेशना व प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी भिक्खू पयाबोधी थेरो भिक्खू प्रशिक्षण केंद्र खुरगाव जि.नांदेड भिक्खू शीलरत्न (रमाई बुद्ध विहार सहयोग नगर नांदेड) भिक्खं संघप्रिय, भिक्खू संघरत्न, भिक्खू चंद्रमणी, भिक्खू धर्मकीर्ती, भिक्खू धम्मघोष ,भिक्खू श्रद्दानंद, भिक्खू शीलभद्र भिक्खू सारीपुत्र, भिक्खू सुयश, भिक्खू संघसेना, भिक्खू सुभद्र (श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव जिल्हा नांदेड )यांची उपस्थिती राहणार आहे भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून माननीय सुरेश दादा गायकवाड (संस्थापक अध्यक्ष प्रजासत्ताक पार्टी) माननीय प्राध्यापक देविदास मनोहरे (नेते प्रजासत्ताक पार्टी) माननीय पी .एस .गवळी (नेते प्रजासत्ताक पार्टी) माननीय सुधाकर कांबळे( माजी उपनगराध्यक्ष/ नगरसेवक न. पा .कंधार ) विलास कांबळे (अध्यक्ष भा.बौ.म. कंधार , नामदेव कांबळे सचिव भा..बौद्ध.म. कंधार, पी एस कांबळे अध्यक्ष भा बौ.म . संघ मुखेड, जितेंद्र ढवळे कोषाध्यक्ष भा.बो.म. कंधार यांची उपस्थिती लाभणार आहे.
प्रमुख उपस्थिती म्हणून यशवंतराव गच्चे( कार्यकारी अभियंता सेवानिवृत्त अधिकारी ) बी.जी. पवार (का अ.वीजवितरण से.नि.अधिकारी, बी. जी . पवार (का अ.वीजवितरण से.नि.अधिकारी, बी बी पवार (अध्यक्ष नागसेन बुद्ध विहार भूकमारी )मा.डॉक्टर उत्तमराव सोनकांबळे ( राज्य सचिव मंत्रालय कर्मचारी संघटना मुंबई)सौ महानंदाबाई मारुती मडके सरपंच राऊतखेडा, शिला महानंद गर्जे पोलीस पाटील राऊतखेडा, गजानन नामदेव घोसले (तंटामुक्त अध्यक्ष )शंकर आगलावे, एस.टी पंडित, देवानंद निखाते, अशोक गायकवाड ,डी. डी भालेराव ,एस.डी. दामोदर ,एस.टी पंडीत, अंबादास हनुमंते,वामनराव कावळे ,साहेबराव पुंडगे, पी.सी .शिंदे ,एस.डी. लांडगे,पि.सी.शिंदे, अरविंद घुले,देविदास ढवळे दयानंद वाघमारे आष्टीकर,यांच्यासह अनेक जण उपस्थित राहणार आहेत.
रात्रीला भीमशाहीर राहुल भुजबळ परभणी व दिपाली कांबळे लातूर यांच्या भीम बुद्ध गीतांचा दणदणीत कार्यक्रमाचे आयोजित केले आहे तरी परिसरातील बौद्ध उपासक उपासिका व गावातील नागरिक याने कार्यक्रमाचा घ्यावा असे स्वागत अध्यक्ष एलियन गरजे यांच्यासह बुद्ध विहार समिती व समस्त गावकरी मंडळी यांनी आव्हान महाबोधी बुद्ध विहार समिती राऊतखेडा यांनी केले आहे.