लोहा| ऊसतोड कामगार असलेल्या बाप लेक असा चौघा जणांवर धावरी शिवारात मंगळवारी वीज पडली यात तिघेजण जागीच ठार झाले तर सोळा वर्षीय मुलगी जखमी असून तिच्यावर विष्णुपुरी येथे उपचार सुरू आहेत. पानभोशी येथील मयत माधव डूबुकवाड यांच्या कुटुंबीयांची जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी भेट घेतली त्याचे सांत्वन केले. हे कुटुंब उभे राहावे यासाठी शासकीय योजनांचा काही लाभ देता येईल काय.? याबाबत त्यांनी उपविभागीय अधिकारी मंडलिक व तहसीलदार मुंडे यांच्याशी सकारात्मक चर्चा केली.
मंगळवारी( दि१८ ऑक्टोबर ) .दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास शेतातील लिंबाचे झाडावर वीज कोसळली त्या झाडा खाली असलेले 1) माधव पिराजी डुबूकवाड, (वय 40 वर्ष, रा. पानभोसी, ता.कंधार) 2) पोचीराम शामराव गायकवाड(,वय 50 वर्ष, रा.पेठ पिंपळगाव, ता.पालम) .व त्याची मुलगी रूपाली पोचीराम गायकवाड, (वय 16 वर्ष, रा.पेठ पिंपळगाव, ता.पालम ) हे तिघे जागीच मरण पावले ते मयत माधव यांची मुलगी.पूजा माधव डुबुकवाड, ( वय 17 वर्ष, रा.पानभोसी, ता.कंधार) ही मुलगी गंभीररीत्या जखमी झाली तिच्यावर विष्णुपुरी येथे उपचार सुरू आहे.सकाळी शोकाकुल वातावरणात माधव डूबुकवाड यांच्यावर पानभोशी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सांयकाळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पानभोशी येथे मयत माधव यांच्या कुटुंबाची भेट घेतली त्यांच्या पत्नी सुलोचना (वय ४० ) मुलगा पवन (वय १६) यांचे सांत्वन केले. त्याची विचारपूस केली. शासकीय मदत लवकर मिळेल असे आश्वासित करतानाच जिल्हाधिकारी यांनी इतर काही शासकीय योजनांचा लाभ देता येईल काय(?) जेणेकरून मयत माधव डूबुकवाड यांचे कुटुंब या आघातातून सावरू शकेल यासाठी प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुलगी पूजा हीच्यावर वैदयकीय उपचार योग्य व तातडीने व्हावेत यासाठीही त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. जिल्हाधिकारी यांची संवेदनशीलता ग्रामस्थांना प्रभावित करणारी होती. यावेळी उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक तहसीलदार व्यंकटेश मुंडे, राष्ट्रवादी किसान सेलचे प्रदेश सरचिटणीस व सरपंच मनोहर पाटील भोसीकर, उपसरपंच शिवकुमार भोसीकर, मंडळधिकारी हेमंत सुजलेगावकर व शेख सायबनजी, तलाठी एन सुंदरगुरवीर, एम नारमवाड व कसेवाड यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
● इमामवाडी येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट●
इमामवाडी ( ता कंधार) येथील तरुण शेतकरी संभाजी विठ्ठल जिंके( वय 38 वर्ष) यांनी मागील वर्षी २८जुलै रोजी आत्महत्या केली होती. त्याच्या कुटुंबियांची जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी "उभारी" अंतर्गत भेट घेतली. त्याची पत्नी कविता तसेच मुले यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्यांना शासकीय मदत मिळाली काय? संगानि योजना लाभ मिळतो काय याची प्रत्यक्ष विचारपूस केली. यावेळी त्याच्या सोबत उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार व्यंकटेश मुंडे व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या नंतर जिल्हाधिकारी श्री राऊत यांनी कंधार तहसील कार्यालयास पाहिलीच भेट होती. त्यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले सूचना दिल्या. त्यानंतर नवघरवाडी येथे शेती बांधावर जाऊन ई-,पीक नोंदणी केली उपस्थित शेतकऱ्यांना यात सहभागी होण्याचे आवाहन केले.