नांदेड| मराठवाडा जनता विकास परिषद शहर शाखेच्या नवीन कार्यकारिणीची निवड एका बैठकीत करण्यात आली. शहराध्यक्षपदी ऍड.प्रदीप नागापूरकर तर सचिवपदी प्रा.लक्ष्मण शिंदे यांच्यासह कार्यकारिणी व इतर पदांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मराठवाडा जनता विकास परिषद शहर शाखेची बैठक जिल्हाध्यक्ष इंजि.द.मा.रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली तर केंद्रीय अध्यक्ष माजी खा.डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. जुन्या कार्यकारिणीची मुदत संपल्याने नवीन कार्यकारिणीच्या निवडीसह इतर विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. शहराध्यक्षपदी पत्रकार ऍड. प्रदीप अनंतराव नागापूरकर यांची तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ सदस्य प्राचार्य गोपाळराव कदम, सचिवपदी प्रो.डॉ. लक्ष्मण शिंदे, कोषाध्यक्षपदी प्रा.अरविंद जोगदंड,
सहसचिवपदी ऍड.केदार जाधव यांची तर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रो.डॉ.अशोक सिध्देवाड, प्रा. विकास सुकाळे यांची तर शहर कार्यकारिणीवर सेवानिवृत्त विक्रीकर अधिकारी रामराव थडके, प्रा.डॉ.डी.एन.मोरे, इंजि. प. दी. राजूरकर, फारुख अहेमद, डॉ.हंसराज वैद्य, डॉ. बालाजी कोम्पलवार, श्रीमती डॉ.पुष्पा कोकीळ, रामचंद्र देठे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी गणेश पाटील, राज गोडबोले आदी उपस्थित होते.