उस्माननगर, माणिक भिसे। महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी सातत्याने प्रबोधन व आंदोलने करणारी वैचारिक सामाजिक संघटन म्हणून ओळख असलेली अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्स आणि बहुजन मजूर कामगार आघाडीच्या वतीने १४ ऑक्टोबर, २०२२ ते १४ नोव्हेंबर २०२२ या एक महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्र राज्यव्यापी समाज जोडो प्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सचे संस्थापक अध्यक्ष बा.रा. वाघमारे यांनी दिली आहे.
प्रबोधन यात्रेसाठी प्रा. डॉ. शंकर मवार यांचे नेतृत्व व मार्गदर्शन मोलाचे असल्याचेही वाघमारे यांनी सांगितले आहे. या यात्रेमध्ये बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वीस कलमी कार्यक्रम आखण्यात आला आहे. यामध्ये विशेषतः मतदानासाठी उपयोगात आणणारी ईव्हीएम मशिन बंद करून पारदर्शक निवडणुकीसाठी बैलेट पेपरचाच उपयोग करावा, मुंबई विद्यापीठास अण्णा भाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे, देशातील सरकारी उद्योग विकण्याचे तात्काळ बंद करून खाजगी उद्योगांमध्येही आरक्षण लागू करण्याचा कायदा करावा, एक देश एक अभ्यासक्रम लागू करून यापुढे फक्त सरकारी शाळेतूनच शिक्षण द्यावे व खाजगी इंग्रजी शाळेमध्ये बहुजनाच्या पाल्यांना फ्री शिक्षण या समाज जोडी
द्यावे आणि त्या शाळेची फीस सरकारने भरावी अन्यथा या शाळांना अनुदान द्यावे. ज्या शाळा अनुदान घेत नाहीत त्या बंद करण्यात याव्यात, धार्मिक बाबतीत समता निर्माण होण्यासाठी हिंदूतील सर्वच जातीतील व्यक्तींना शंकराचार्य, पुजारी व विश्वस्त म्हणून नेमण्यात यावे त्यामुळे एका जातीचे वर्चस्व राहणार नाही, लॅटरल पद्धतीने केंद्रीय सचिवालयात संयुक्त सचिव पदासाठी जी लॅटरल पद्धत वापरून केवळ सवर्ण जातींनाच संधी दिल्या जात आहे ती तात्काळ बंद करण्यात यावी आणि अनु. जाती व अनु. जमातीच्या लोकांनाही क्रिमीलेअरची अट लावून त्याची मर्यादा २० लाखापर्यंत करण्यात यावी. या
महत्त्वाच्या मागण्यांसह इतर मागण्यांबाबतीत जनजागरण करण्यासाठी या यात्रेची सुरुवात बहुजन समाजातीत ज्येष्ठ मार्गदर्शक नांदेड जि.प. चे माजी अध्यक्ष कालवश संभाजीराव मंडगीकर यांच्या मंडगी ता. देगलूर येथून त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन कार्यक्रमाचे उद्घाटन मा.बा. नरंगलकर, राजेंद्र मंडगीकर यांच्या हस्ते करण्यात येवून राज्यातील विविध जिल्ह्यातून ही यात्रा दि. १४ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबई येथे पोहचणार असून त्या दिवशी विराट सभेमध्ये त्याचे रूपांतर होणार आहे. या समाज जोडो प्रबोधन यात्रेसाठी आर्थिक, शारीरिक व बौद्धीक सहकार्य करण्याचे आवाहन बा.रा. वाघमारे व प्रा. डॉ. शंकर गड्डमवार यांनी केले आहे.