उस्माननगर, माणिक भिसे। आपल्या मुलांना घडविण्यासाठी आईल जिवाचे रान करीत असल्याची सतत आठवण ठेवून विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन अधिकारी, किंवा कर्मचारी अशी खूनगाठ मनाशी बांधून आई वडीलांचे स्वप्न पूर्ण करावे, विद्यार्थ्यांनी जिद्दीने आभ्यासात स्वता: ला वाहून घेतले तर आई- वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही अवघड नसल्याचे जिल्हाधिकारी श्रीकेश लाठकर यांनी समता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधता प्रतिपादन केले.
उस्माननगर येथील समता मा.व उच्च माध्यमिक विद्यालय शाळेच्या आवारात येथील भूमिपुत्र तथा सध्या आध्रा प्रदेश राज्यातील श्रीकाकुलम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीकेश लाठकर यांचा शाळेच्या वतीने शाळेचा माजी विद्यार्थी हा प्रशासकीय सेवेत दाखल होऊन एका जिल्ह्याचे नेतृत्व करत असल्याचे सार्थ अभिमानाने त्यांच्या सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी मुख्याध्यापक तथा संस्थेचे संचालक श्यामसुंदरराव जहागीरदार गुरुजी,हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तमराव देशपांडे,बा.दे. कुलकर्णी, प्रभाकरराव देशपांडे, कमलाकरराव देशपांडे ,अनिरूद्ध सिरसाळकर, मुख्याध्यापक गोविंद बोदेमवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.सर्वप्रथम सरस्वती मातेचे प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. इयत्ता आठवीतल्या विद्यार्थ्यीनी सुप्रीया गवाले हिने सुंदर व मधूर असे सरस्वती स्तवन सादर करुन पाहुण्याचे स्वागत केले. तिच्या आवाजाने सर्वजन मंत्रमुग्ध झाले.त्यानंतर उपस्थित आतिथिचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी लाठकर पुढे बोलताना म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्याचे आई वडील आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी दिवस - रात्र काबाडकष्ट करून जिवन जगत असतात. गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केल्यास आपल्या हिताचे असते. विद्यार्थ्यांनी कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मोठे ध्येय सफल करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे.वाचनाची प्रत्येकांना आवड निर्माण करावी त्यामुळे मन प्रसन्न व तरूण,तेज असते.आजच्या काळात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवले पाहिजे आणि सतत ग्रामीण भागातील म्हणून न्युनगंड बाळगण्याची आवश्यकता नाही.जिद्दीने कष्ट अभ्यास केल्यास अशक्य असणारी गोष्ट शक्य होते. त्यासाठी मनामध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे.
मुलांचे वय हे खेळण्यांचे ,बागडण्याचे असते . ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी आपणाला वस्तुस्थितीची जाणीव असते ग्रामीण भागातील वस्तुस्थितीच्या गोष्टीची जाणीव करून देते दुसऱ्यापेक्षा काहीतरी नवीन करायला पाहिजे बाहेर देशात जाण्यासाठी अनेकांची चळवळ असते जर आपल्याच माय भूमीत नवीन संकल्पना तयार केल्या तर येणाऱ्या पिढीसाठी फायद्याची ठरणार आहे मी जर सॉफ्टवेअर इंजिनियर असून सुद्धा ते क्षेत्र सोडून मी या क्षेत्राकडे वळलो, जरी हे क्षेत्र अवघड असले तरी प्रत्येकानै प्रयत्न करायला काही हरकत नाही.
आत्मविश्वास ठेवून आपले ध्येय निश्चित करुन आई वडिलांचे स्वप्न साकार केले पाहिजे, असे जिल्हाधिकारी श्रीकेश लाठकर पानी सांगितले. यावेळी शामसुंदर जहागीरदार गुरुजी, पवनेकर, मुख्याध्यापक बोदेमवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राम पवार, मारोती गोरे, बालाजी भिसे,मोहन लामदाडे यानी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतमी कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन सहशिक्षक वि.सोनवणे यांनी मानले.यावेळी शाळैतील शिक्षकवृंद कर्मचारी , पत्रकार उपस्थित होते.