नविन नांदेड। दिपावली सणांचा निमित्ताने नरसिंह प्राथमिक शाळा सिडको येथील सुमारे ६५२ विद्यार्थ्यांनी आकाश कंदील व विविध आकारातील ग्रेटींग भेट कार्ड तयार केले असून या सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
जनता शिक्षण प्रसारक मंडळ ऊमरदरी सचंलीत सिडको नरसिंह विद्यामंदिर प्राथमिक शाळा येथे संकलीत मुल्यमापन अंतर्गत दिपावली सणांचा निमित्ताने विद्यार्थ्यांना सप्तगुणांना वाव मिळावा व आपल्या हातुन कलागुणांचा आविष्कार मिळावा यासाठी शिक्षकांनी दिपवाली सणाचा पार्श्वभूमीवर कागदापासून कंदील बनविणे व ग्रेटींग भेट कार्ड तयार करणे ८ ते ११ आक्टोबंर या ऊपकमात पहिले ते चौथी मधील एकुण ६५२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला यात कागदा पासून तयार केलेली अनेक आकाश कंदील, रंगबेरंगी विविध कलाकृती मध्ये तयार केले आहेत,अतिशय उत्स्फूर्त पणे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्ये अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी सहभागी विद्यार्थी यांचे कौतुक केले आहे तर शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना एंकुडवार यांच्या मार्गदर्शनाखाली संगेवार,मामडे,पोहरे,झाडे, वाघमारे, वाडीकर, क्षिरसागर,चौलवाड,दिलीप कोणापुरे , विठ्ठल शिंगणवाड यांनी परिश्रम घेतले.