नवीन नांदेड। भारत सरकार व भारतीय सेना दल यांच्याकडून पुरस्कृत राष्ट्रीय शास्त्र सेनेच्या मुलींच्या तुकडीस जनता शिक्षण प्रसारक मंडळ,उमरदरी व्दारा संचलित शिवाजी विद्यालय, सिडको, नवीन नांदेड येथे २६ विद्यार्थीनींच्या वाढीव एनसीसी तुकडीला मान्यता मिळाली आहे व सदरील तुकडी मध्ये मुलींची भरती करण्यात आली. सध्या ३८ मुले व ३८ मुली असे एकुण ७६ शालेय विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.
शिवाजी विद्यालय नवीन नांदेड भागातील एक उपक्रमशील शाळा आहे.याची प्रचीती नेहमीच येत असते.सदरील विद्यालयात नेहमीच विविध सहशालेय उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या अंगी अनेक कौशल्यांची ॠजवणूक करण्यात येत आहे.एनसीसी च्या माध्यमातूनही या विद्यालयातील विद्यार्थी भारतीय सैन्यासाठी भविष्यात भरीव योगदान देणार आहेत.
राष्ट्रीय शास्त्र सेनेच्या मुलींच्या तुकडीस मान्यता मिळाल्या बद्दल व सदरील तुकडीत विद्यार्थीनींच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव, उपमुख्याध्यापक रवी जाधव, मुख्याध्यापक प्रा.व्ही.के. हंगरगेकर ,पर्यवेक्षक .एन.एम भारसावडे, सौ.निमा कदम, असोशिएट एन.सी.सी. ऑफिसर एस. आर. भोसीकर, व्ही.एस वाघमारे यांनी अभिनंदन केले आहे. राष्ट्रीय शास्त्र सेनेच्या मुलींच्या तुकडीस मान्यता दिल्या बदल एनसीसी कमांडींग ऑफीसर कर्नल एम. रंगाराव, ऑफीसर ले. कर्नल वेत्रीवेलू एस.यांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले. राष्ट्रीय शास्त्र सेनेच्या मुलींच्या तुकडीची निवड करण्यात बी.एच.एम. सुनिलकुमार,हवालदार यशवीर सिंग यांनी निवड प्रक्रियेत विशेष योगदान दिले आहे.