नविन नांदेड। हडको येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे ग्रंथराज एकनाथी भागवत पारायण सोहळा निमित्ताने भाविक भक्तांना पुर्ण पोळी जेवण देऊन हा सोहळा संपन्न झाला. यावेळी परिसरातील अनेक भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
हडको येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान येथे ५ ते १९ आक्टोबंर दरम्यान श्री एकनाथी भागवत पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी संजय रूद्रवार यांनी २२ एकनाथी व १० भागवत कथा भेट दिली,या पारायण सोहळ्याला २५ भाविक भक्त बसले होते. आज १९ आक्टोबंर रोजी सकाळी हभप आत्मा राम महाराज रायवाडी यांच्या किर्तन सोहळ्यानंतर महाआरती होऊन भाविक भक्तांच्या ऊपसिथीत कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी तुत्पा येथील भजनी मंडळ यांच्या सहभाग होता, भाजपा नगरसेविका प्रतिनिधी संजय पाटील घोगरे, गोविंद पाटील घोगरे, रेवणनाथ टाक महाराज,चंदु महाराज, बालाजी गुडेवार,माधवराव येलुरकर, होळंबे यांच्या सह वारकरी संप्रदाय मधील अनेक मंडळी ऊपसिथीती होती.हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विठ्ठल रूक्मिणी मंदिर पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.