सिडकोच्या बाजार पेठेत आकर्षक आकाशदिवे घेण्यासाठी गर्दी, विविध साहित्यांनी प्रतिषठाणे गजबजली -NNL


नवीन नांदेड।
सिडको हडको परिसरातील बाजार पेठेत अनेक विक्रेत्यांकडे विविध कलाकृतीतून साकारलेली आकर्षक अशी दीपावली सणानिमित्य आकाशदिव्यांसह इतर साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठ गजबजून गेली असून, खरेदीसाठी मोठया प्रमाणात गर्दी दिसून येत असुन अनेक प्रतिष्ठानानी रोषणाई करून विविध वस्तूची आकर्षक सजावट केली आहे.

 दिवाळी सणाच्या निमित्ताने परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या अनेक जनरल स्टोर्स मधून व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली  राज्यातील मुबई ,पुणे , नाशिक यासह पररायेथून आणलेले  अशी आणलेली आकाशदिवे मोठ्या प्रमाणात बाजार पेठेत उपलब्ध झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी होत आहे ,विशेषताह सायंकाळच्या वेळेस प्रकाश झोतात विविध प्रकारचे दिवे व्यापाऱ्यांनी लावून सजावट केल्याने परिसरातील बाजारपेठ आकाश दिव्यांनी गजबजून गेली आहेत.

दिवाळी साहित्य खरेदी करण्यासाठी सिडकोतील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळत आहे , रांगोळी सह , महालक्ष्मी फोटो व दिपवाली साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले असून मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून व्यापार पेठ गजबजून गेली आहे. रेडिमेड कापड दुकान सह ,किराणा , इलेक्ट्रॉनिक, स्वीट होम,यासह अनेक ठिकाणी परिवारातील सदस्य यांच्या सह महिला मुले मुली दिवाळी सणाच्या निमित्ताने खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी