पुणे ओशो आश्रमाच्या विक्री विरुद्ध 11 डिसेंबर पासून देशव्यापी जेलभरो आंदोलन-स्वामी गोपाल भारती -NNL


नांदेड। पुण्यातील ओशो आश्रमाच्या विक्री विरुद्ध  11 डिसेंबर पासून देशव्यापी जेलभरो आंदोलनाचा इशारा ओशो आश्रमाचे प्रमुख स्वामी गोपाल भारती यांनी पत्रकार परिषदेत दिला.

 पुणे येथील ओशो आश्रमाच्या संचालकांनी धर्मादाय आयुक्त, मुंबई यांची दिशाभूल करून ओशो आश्रम, पुणे येथील आश्रमाच्या मालकीची तीन एकर जमीन विकण्यासाठी नवीन निविदा काढायला लावली आहे. यापूर्वी पहिली निविदा जी धर्मादाय आयुक्तांच्या परवानगी शिवाय काढण्यात आली होती, तिला रद्द करण्यासाठी ओशोप्रेमींचे आंदोलन चालू आहे आणि त्याचा निकाल लागण्यापूर्वी दिनांक 10 ऑक्टोबरला लाखो ओशोप्रेमींच्या भावना पायदळी तुडवत  धर्मादाय आयुक्तांनी एक नवीन आदेश

निर्गमित केला की 15 नोव्हेंबर पर्यंत नवीन निविदा दिली जाऊ शकेल. याआधी ओशो इंटरनॅशनल फाउंडेशन, पुणे यांनी कुठल्याही पूर्व परवानगी शिवाय 107 कोटी रुपयांमध्ये त्या जमिनीचा सौदा बजाज ग्रुप सोबत केला होता आणि अग्रीम रक्कम म्हणून त्यांच्याकडून 50 कोटी रुपये घेतले

होते ज्यामुळे संपूर्ण विश्वातील ओशोप्रेमी संतप्त झाले होते. पुण्यातील ओशो आश्रमाच्या मुख्य कार्यालयाला विदेशी संचालकांनी झुरिख मध्ये स्थानांतरित केले आहे आणि त्यात चार भारतीय  संचालकांनी त्यांना सहकार्य केले आहे असा आरोप स्वामी गोपाल भारती यांनी केला. बाशो एरिया मधील तीन एकर जमिनीची विक्री त्वरित थांबविली जावी. बजाज ग्रुपला त्यांच्याकडून घेतलेली ५० कोटींची अग्रीम रक्कम परत केली जावी. नवीन निविदेची नोटीस परत घेतली जावी.समाधीमध्ये प्रवेश करण्यासाठी रु.९७० ऐवजी रु.१०० घेतले जावेत. सर्व संन्याशांना माळ घालून मध्ये जाण्याची परवानगी दिली जावी. 

समाधीचा हटवलेला बोर्ड पुन्हा लावण्यात यावा आणि त्यामध्ये ओशोंचा तोच जुना फोटो लावला जावा. संपूर्ण वर्षभरात ओशोंच्या काळी जे गुरुपौर्णिमा, ओशो जन्मोत्सव, महापरिनिर्वाण दिवस, ओशो संबोधि दिवस उत्सव इत्यादि साजरे केले जात होते ते पुन्हा एकदा सुरू केले जावेत. वेतन भोगी कर्मचाऱ्यां ऐवजी अवैतनिक सेवा देणाऱ्या संन्याशांना ठेवले जावे जसे पूर्वी होत होते आदी मागण्या स्वामी गोपाल भारती यांनी यावेळी केल्या. या पत्रकार परिषदेला नांदेड आश्रम चे सन्यासी स्वामी प्रेम प्रशांत, स्वामी गुरमुख भारती, मां प्रेम सुगंधा, मा संगीता, सुरेश जोंधले,  अंतर विवेक उर्फ जगन शेल्के तसेच भारतीय जनता पार्टी चे शहर के उपाध सुहास पाटील हे उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी