नांदेड। राष्ट्रीय नेते खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ०७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात येणार आहे. या अनुषंगाने बुद्धीजीवींशी संवाद हा उपक्रम नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सचिव बापूसाहेब पाटील यांनी आयोजित केला आहे.
या उपक्रमा अंतर्गत दि. ०४ नोव्हेंबर पर्यत, बुद्धीजीवींशी व्यक्तिगत पातळीवर संवाद साधल्या जाणार आहे. दरम्यान संवाद पुस्तकीचे प्रकाशन रविवार (ता.३०) रोजी माजी मंत्री डी. पी. सावंत यांच्या हस्ते जिल्हा कार्यालय येथे करण्यात आले. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा येत्या रविवार (ता.७) रोजी देगलूर नांदेड मार्गे महाराष्ट्रात दाखल होत आहे. भारत जोडो यात्रेची उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
दरम्यान या यात्रेसंदर्भात भारत जोडो यात्रेची भूमिका घेवून, दि ४ नोव्हेंबर पर्यत बुद्धीजीवींशी व्यक्तिगत पातळीवर संवाद उपक्रम नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव बापूसाहेब पाटील हे राबविणार आहेत. यादरम्यान उच्चशिक्षित व्यक्ती, विचारवंत, लेखक, ज्येष्ठ पत्रकार, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, सल्लागार आदी बुद्धीजीवींशी व्यक्तिगत पातळीवर संवाद साधल्या जाणार आहे. या संदर्भातील संवाद पुस्तकीचे प्रकाशन माजी मंत्री डी.पी. सावंत यांच्या उपस्थितीत रविवार (ता.३०) रोजी भारत जोडो संपर्क कार्यालय येथे करण्यात आले.