नांदेड। शिवसेनेच्या उपनेत्या तथा बहुजनांचा बुलंद आवाज सुष्माताई अंधारे यांचे नांदेड नगरीत भगवमय स्वागत करताना शिवसेनेचे सुभाष वानखेडे, जिल्हाप्रमुख नागेश आष्टीकर, दत्ता कोकाटे उपजिल्हाप्रमुख रवीभाऊ हाटकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिन पाटील आदींसह अनेकजण उपस्थित होते.
त्यानंतर सुष्माताई अंधारे यांनी पत्रकारांशी संवाद साधून सध्या महाराष्ट्रात भाजपकडून सुरू असलेल्या गलिच्छ राजकारण यावर भाष्य करत अनेक नेत्यांच्या वक्तव्याचा निषेध करत सडकून टीका केली. सध्या महाराष्ट्र राज्यात मराठी माणसावर अन्याय करण्यासाठी त्यांचं खच्चीकरण करण्याचं राजकारण सुरू आहे.
सध्या खोक्याची चर्चा सुरू आहे, आत्ता रवी राणा यांनी याबाबत विधान केले. त्यामुळे त्यांच्या आरोपात तथ्य असेल तर एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी खोके घेतलं आहे का..? तर हा आरोप खोटा असेल तर राणांना पाठबळ देणारे देवेंद्रजी संबंध महाराष्ट्राची माफी मागतील का..?