हदगाव, शे.चांदपाशा| हदगाव शहराच्या कोणत्याही कोपऱ्यात गेल्यावर प्रमुख रोड चौकामध्ये फुकटच्या जाहीरात बाजीने शहर परिसर गजबजलेला दिसुन येत आहे. भलेमोठे अनधिकृत होर्डीग लावण्याच्या जणूकाय स्पर्धा आसल्याच जाणवत आहे. हदगाव नगरपरिषदेला फुकटच्या जाहीरातीच्या होर्डीगचा विळाखा पडलेला दिसुन येत आहे.
हदगाव शहरातील मुख्य सत्यावरिल आणि चौकात फ्रि जाहिराती मुळे नेत्यांची व काही शैक्षणिक संस्थाचा व प्रतिष्ठाणाचा बडेजावपणा दिसुन येत असला तरी, शहरात गल्लीबोळात विद्रीपीकरणा सोबतच परिणाणम स्वरुप नगरपरिषदेचे उत्पन्न माञ घटलेले दिसुन येत आहे. अवैधरित्या होर्डीग लावणाऱ्यावर माञ न.पा.प्रशासन करत नसल्याने बिनधास्तपणे कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याच्या किवा उयोन्मुख युवानेत्याचा मिञाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे.
किंवा जयती पुण्यतिथी असल्यास श्रद्धाजंली देणे यासह अनेक प्रकारचे विशिष्ट प्रेम नेत्यावरच प्रेम दाखविण्यासाठी शो करणे. सध्या तरी याच फँड दिसुन येते आहे. या बाबतीत न.पा.प्रशासनने आपले या अनधिकृत होर्डीग बद्दल धोरण काय आहे. या बाबतीत प्रशासनाकडुन काहीही माहीती मिळत नाही. आणखी विशेष म्हणजे नगरपालिकेचे जाहीरात उत्पन्न घटलेले आहे. न.पा. विभागात जाहीरात विभाग कार्यव्नित आहे की नाही या बाबतीत ही काही माहीती मिळत नाही. शाहरात जर कुठं होर्डिग लावायची तर न.पा.ची परवानगी लागते. परंतु प्रत्यक्षात माञ या बाबतीत दुर्लक्ष करण्यात येते ही वस्तुस्थिती आहे.