हिमायतनगरात टाटा मैजिकने दुचाकीस्वाराला उडविले; युवकाचा मृत्यू; हि घटना घातपात असल्याचा संशय -NNL


अपघातानंतर रस्त्याची रुंदी, डिव्हायडरचा प्रश्न आला ऐरणीवर; 
ठेकेदारावर आणि वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणीआता उड्डाणपूल डिव्हायडर व रस्ता पूर्वीच्या अंदाजपत्रक प्रमाणे होण्यासाठी आंदोलन पेटण्याची शक्यता

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याची रुंदी कमी करून डिव्हायडर गायब करण्याचा प्रताप राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने काही राजकीय नेत्यांना हाताशी धरून केला आहे. यामुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असून, ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि आज दि 10 सोमवारी सायंकाळी 7 वाजता दुचाकीला उडविणाऱ्या वाहनचालकांवर खुनाचा गून्हा दाखल करून न्याय द्यावा. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह हलविणार नाही असा पवित्रा हिमायतनगर येथील युवकांनी घेतला आहे. अशी माहिती भाजप युवा मोर्च्याचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोचून भरधाव वेगातील वाहनाला पोलीस ठाण्यात नेल्याचे सांगितले जात आहे. वृत्त लिहीपर्यंत याबाबत कोणतीही नोंद पोलीस ठाण्यात झाली नव्हती.  मात्र या घटनेनंतर शहरातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या अंदाजपत्रकात प्रस्तावित असलेल्या उड्डाणपूल डिव्हायडर व रस्ता पूर्वीच्या अंदाजपत्रक प्रमाणे होण्यासाठी आंदोलन पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आतातरी राजकिय नेत्यांनी आपला स्वार्थीपणा बाजूला ठेऊन हिमायतनगर शहरातील रस्ता अगोदर ठरल्याप्रमाणे करण्यासाठी ठेकेदाराला जाब विचारला पाहिजे अशी रास्त अपेक्षा नागतिकातून व्यक्त केली जाते आहे. अन्यथा आगामी काळात हिमायतनगर शहर अपघाताचे केंद्रबिंदु झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र खरे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर शहर ते तालुक्याचे ठिकाण असून, एकीकडे तेलंगणा राज्य तर दुसरीकडे विदर्भ आहे. हिमायतनगर शहरातील व्यापारपेठ मोठी असून, येथे रेल्वे स्थानक आहे, त्यामुळे या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या नागरिकांसह वाहनधारकानाची मोठी वर्दळ रात्रंदिवस सुरूच असते. मागील ४ वर्षापासन हिमायतनगर शहरातून धानोडा ते भोकर हा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. हिमायतनगर रेल्वेगेटपासून ते भोकर पर्यंतचे काम ठेकेदाराने वर्षभरात पूर्ण केले. मात्र हिमायतनगर रेल्वे गेट ते किनवट पर्यंतचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून ४ वर्षापासन संत गतीने काम सुरु आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीवघेणा प्रवास करावा लागत असून, काम सुरु झाल्यापासन आत्तापर्यंत या रस्त्यावर १० ते १५ जणांचा मृत्यू अपघात होऊन झाले आहेत. तरीदेखील ठेकेदाराने रस्त्याच्या कमला गती दिली नसल्याने दिवसेंदिवस अपघात होताच आहेत.


मागील १५ दिवसापूर्वी हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाट्यानजीक अपघात होऊन ५ जणांना जीव गमवावा लागला होता. यापूर्वी तीन अपघातात अनेकांचे जीव गेला होता. असे असतानाही ठेकेदाराने हिमायतनगर शहरातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग कामाला गती तर दिलीच नाही. उलट या ठिकाणाहून मंजूर असलेले उद्दाहन पूल गायब करून रस्त्याची रुंदी कमी केली आहे. त्यामुळे रस्त्याच्या मधोमध होणारे डिव्हायडर देखील गायब करण्यात आल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. शहरातील मुख्य रत्स्यावर मोठी दुकाने असल्याने वाहने थांबून असतात तसेच ग्राहकांची वॉर्डात सुरु असते,याचा रत्स्यातून रेल्वे स्थानक पार करावे लागते.


रस्त्यावरून श्रीक्षेत्र परमेश्वर मंदिराला जावे लागते एवढी मोठी वर्दळ असताना देखील तघेकदाराने अभियंत्याशी मिलीभगत करून राजकीय नेत्याला हाताशी धरून शहरातून जात आसेल रास्ता अरुंद करून मंजूर निधीत मोठी हेराफेरी केली आहे. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत असून, आज दि.१० रोजी दिवसभर आपला चहाचा व्यवसाय करून प्रदीप प्रकाश जाधव वय ३० वर्ष हा युवक एम एच २६ बी - डब्लूयु २३९१ या दुचाकीवरून गावाकडे परत जात असताना भरधाव समोरून भरधाव वेगात येणाऱ्या टाटा मैजिक क्रमांक एम एच २६-ए एफ २७४६ ने जबरदस्त धडक दिली. यात युवकाचा जागीच मृत्यू झाला असून, दुचाकींचा चेंदामेंदा झाला आहे. या अपघातानंतर घटनेबाबत विविध चर्चाला उधाण आले असून, जाणीवपूर्वक युवकाच्या वाहनाला उडवून घातपात केला गेला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


या घटनेनंतर शहरातील नागरिक युवक संतापले असून, राष्ट्रीय महामार्ग ठेकेदारावर मनुष्य वधाचा गुन्हा दखल करण्यात यावा आणि भरधाव वेगातील वाहनधारक खुनाचा गुन्हा दखल करून शहरातून जात असलेल्या रस्त्याची रुंदी पूर्वीच्या अंदाजपत्रकाप्रमाणे करून डिव्हायडर सह उड्डाण पूल बांधण्यात यावे. जेणेकरून भविष्यात असे अपघात घडणार नाहीत आणि यामुळे शहरच्या वैभवात भर पडून अनेक बेरोजगार युवकांना उड्डाण पुलाखाली छोटा मोठा व्यवसाय करण्याची संधी मिळेल अशी मागणी केली जात आहे. याचा विचार विद्यमान आणि तालुका व शहरातील जनतेचे हित लक्षात ठेवणाऱ्या पुढार्‍यांनी करायला हवा. अशा प्रतिक्रिया आहे सर्वसामान्य नागरिकांत पुढे येत आहेत. नाहीतर येणार्‍या निवडणुकीत बेंबीच्या देठापासून ओरडणाऱ्या पुढार्‍यांना घरी बसण्याची वेळ जनता आणल्याशिवाय राहणार नाही हे मात्र तेवढेच खरे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी